लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आपल्या घरात कैद झाले आहेत. घरात बसून वैतागलेली मंडळी आता टीव्ही आणि इंटरनेटच्या साहाय्याने वेळ घालवत आहेत. मात्र भारतातील लोक लॉकडाउनच्या काळात इंटरनेटवर काय सर्च करतात याचं एक संशोधन केलं गेलं. SEMrush या कंपनीने केलेल्या संशोधनात आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत.
View this post on Instagram
भारतातील लोक लॉकडाउनच्या काळात सनी लिओनी, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ या अभिनेत्रींना मोठ्या प्रमाणावर सर्च करत आहेत. SEMrushने केलेल्या दाव्यानुसार गेल्या एप्रिल महिन्यात दररोज तब्बल ३९ लाख वेळा सनी लिओनीला सर्च केले गेले. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आहे तिला ३१ लाख वेळा सर्च केले गेले आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कतरिनाला १९ लाख वेळा सर्च केले गेले. पुरुष सेलिब्रिटींमध्ये सलमान खान, विराट कोहली आणि हृतिक रोशन यांना सर्च केले गेले. आकड्यांचं म्हणाल तर सलमान २१ लाख, विराट २० लाख आणि हृतिक १३ लाख वेळा सर्च केला गेला.
या व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, दिशा पटानी, सारा आली खान, करिना कपूर, श्रद्धा कपूर या अभिनेत्रींना देखील मोठ्या प्रमाणावर सर्च केले गेले. भारतातील इंटरनेट युजर्स विविध प्रकारच्या ब्राऊझर्सवरुन कुठले किवर्ड सर्च करतात यांचा डेटा गोळा करुन SEMrushने ही यादी तयार केली आहे. ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे.