प्रियांका चोप्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आठवतेय का? या भेटीमध्ये प्रियांकाने जो तोकडा ड्रेस घातला होता त्यावरुन अनेक वादंग उठले होते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनी दौऱ्याला गेले होते. तिथे प्रियांकाही तिच्या बेवॉच या हॉलिवूडपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेली होती. यावेळी तिने जो ड्रेस घातला होता त्यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
जोनिता गांधी, अॅश किंगचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
देशाच्या पंतप्रधानांना भेटायला जाताना असे तोकडे कपडे घालणं योग्य आहे का असा प्रश्न तिला विचारण्यात येत होता. पण प्रियांकाने यावर कोणतीही शाब्दिक प्रतिक्रिया दिली नव्हती. पण दुसऱ्याच दिवशी तिने आईसोबतचा एका तोकड्या कपड्यातला ड्रेस सोशल मीडियावर शेअर केला होता. याला लेग्ज फॉर डेज् असं कॅप्शन देऊन टिकाकारांना कृतीतून प्रत्युत्तर दिलं होतं.
आता मात्र एवढ्या दिवसांनी प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी यामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे. त्याचे झाले असे की, बेवॉच सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती जर्मनील गेली असता अचानक मोदींना भेटण्याची संधी मिळाली. प्रियांकाचे इतर कार्यक्रम आधीच ठरलेले असल्यामुळे तिला कपडे बदलायला वेळ मिळाला नाही, असे स्पष्टीकरण मधू यांनी दिले.
वाढदिवसाच्या निमित्ताने दीपिकासोबत रणवीरचा नव्या कारमधून फेरफटका
प्रियांकाने मोदी यांची जेव्हा भेट घेतली होती तेव्हा तिच्या तोकड्या कपड्यांमध्ये तिचे पाय दिसत होते. त्यामुळे पंतप्रधानांना भेटताना तुमचे पाय झाकलेले असावेत असा उपदेश तिला अनेक नेटिझन्स देत होते. यामुळे तिने भारतीय संस्कृतीची एकाप्रकारे थट्टाच उडवली असे टोमणेही तिला काहींनी ऐकवले होते.