गुप्तहेर व्यक्तिरेखांच्या संकल्पनेवर आधारित अमेरिकन मालिका ‘क्वांटिको’ने बरीच लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे या अमेरिकन लोकप्रियतेमागे बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्राचा सिंहाचा वाटा आहे. मात्र या मालिकेच्या कथानकावर सध्या भारतीयांनी आक्षेप घेतला आहे. कारण नुकत्याच प्रसारित झालेल्या काही भागांमध्ये भारतीयांविरोधी दृष्ये असल्याने सोशल मीडियावर मालिकेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

१ जून रोजी प्रसारित झालेल्या ‘क्वांटिको’च्या भागात मॅनहॅटनमध्ये पार पडत असलेल्या भारत- पाकिस्तान परिषदेवर अणूबॉम्बने हल्ला करण्याचा कट एक एमआयटी MIT प्राध्यापक रचत असल्याचं दाखवण्यात आलं. हा दहशतवादी एक भारतीय असल्याचं त्यात दाखवण्यात आलं आहे. पाकिस्तानवर दोष देऊन भारतीय दहशतवादी परिषदेवर हल्ला करणार असल्याचं मालिकेचं कथानक आहे. याच कथानकावर भारतीयांनी आक्षेप घेतला असून ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.

https://twitter.com/proudBJPsupport/status/1003499939194908678

https://twitter.com/shuchi_sun/status/1003477733035335680

भारतीयांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप काही युजर्सनी मालिकेच्या निर्मात्यांवर केला आहे तर काहींनी प्रियांका चोप्रावरही टीका केली आहे. पैशांसाठी तू काहीही करू शकतेस असंदेखील एका युजरने तिला म्हटलं आहे. तर काहींनी तिला कथानक बदलण्याविषयी निर्मात्यांकडे बातचित करण्याचा सल्ला दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘क्वांटिको’ ही मालिका आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण पहिल्या सत्रात धुमाकूळ घालणाऱ्या ‘क्वांटिको’ला दुसऱ्या सत्रात प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला.