अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेब सीरिजचा दुसरा भाग अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे ‘मिर्झापूर’प्रमाणेच ‘मिर्झापूर २” या सीरिजलादेखील चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला. त्यामुळेच या सीरिजमधील प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर चर्चिले गेले. विशेष म्हणजे सध्या चर्चा रंगली आहे ती या सीरिजमधील एका अभिनेत्याच्या लग्नाची. या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेला अभिनेता लवकरच विवाह गाठ बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘मिर्झापूर’मधील बबलू भैय्या,मुन्नाभैय्या या पात्रांप्रमाणेच आणखी एक पात्र चर्चेत राहिलं ते म्हणजे रॉबिन. आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रॉबिन अर्थात अभिनेता प्रियांशू पेनयुली हा लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. प्रेयसी वंदना जोशी हिच्यासोबत तो लग्न करणार आहे. तसंच करोनाचा काळ असल्यामुळे कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

gharat ganpati movie announced
कोकणातील कुटुंबाची कथा मोठ्या पडद्यावर! मराठी चित्रपटात पहिल्यांदाच झळकणार ‘कबीर सिंग’मधील ‘ही’ अभिनेत्री
Aai kuthe kay karte fame actress akshaya gurav replace sana sayyad palki in kundali bhagya
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झळकणार लोकप्रिय हिंदी मालिकेत, साकारणार प्रमुख भूमिका!
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

देहरादूनमध्ये ५० पाहुण्यांच्या उपस्थिती प्रियांशू व वंदना लग्न करणार आहेत. त्यानंतर मुंबई परतल्यानंतर त्यांनी मित्रपरिवार व कलाविश्वातील सेलिब्रिटींसाठी एका पार्टीचं आयोजन केलं आहे.

आणखी वाचा- मिर्झापूर-२ चा ‘मिस्ट्रीमॅन’ रॉबिनविषयी या गोष्टी माहिती आहेत का?

दरम्यान, वंदना ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून उत्तम नृत्यांगना आहे. यापूर्वी तिने लघुपटांमध्ये काम केलं आहे. दिल से दिया वचन’, ‘सपनों के भवर में’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर प्रियांशूने मिर्झापूर व्यतिरिक्त हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसंच लवकरच तो रश्मी रॉकेटमध्येही झळकणार आहे.