पॉर्न विश्वातून बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री सनी लिओनीला अनेकदा विरोधाला सामोरे जावे लागले आहे. यावेळीही बंगळुरु येथे होणाऱ्या तिच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आल्याचे वृत्त आहे. नववर्षाचे औचित्य साधून ३१ डिसेंबरला रात्री बंगळुरु येथे होणाऱ्या एका कार्यक्रमाला सनी उपस्थित राहणार होती. मात्र, काही कन्नड समर्थकांच्या संघटनांना सनीचे उपस्थित राहणे पटत नसल्याने त्यांनी विरोध केला. या संघटनांनी ३१ डिसेंबरला होणारा कार्यक्रम आणि सनीच्या विरोधात गुरुवारी निदर्शने केली.

वाचा : ..अन् ऐश्वर्याने ओखी चक्रीवादळाचीही पर्वा केली नाही

सनी लिओनीचे फोटो जाळून ‘कन्नड रक्षक वेदिके’ने (KRV) वर्षाच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध केला. अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या संस्कृतीला घातक असून, याप्रकारे नववर्षाचे स्वागत केले जात नाही, असे या संघटनांचे म्हणणे आहे. तसेच, त्यांनी सनीचा कार्यक्रम रद्द करण्याचीही मागणी केली.

वाचा : सॅनिटरी नॅपकिनविषयी दियाने दिला महत्त्वाचा संदेश

अलिशान हॉटेलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तिकीटांची विक्रीही करण्यात आली आहे. एका मोठ्या जाहिरात कंपनीने सनीच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे कळते.