अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्यात नव्यानेच फुलत असलेल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हे दोघेही लग्न करणार अशी चर्चा माध्यमांमध्ये होती पण प्रत्यक्षात या दोघांच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबीयांकडून विरोध आहे. त्यामुळे लग्नगाठ बांधून जवळ येण्यापेक्षा एकमेकांपासून दूर होण्यालाच ते प्राधान्य देतील, अशी शक्यता निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.
बिपाशा बसूच्या आईने तर स्पष्टपणे या दोघांच्या नात्याला विरोध केला असून, तिने बिपाशाला करणपासून लांबच राहण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते. तर दुसरीकडे करणच्या आईलाही बिपाशा सून म्हणून नकोय. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांकडूनही करणला बिपाशापासून दूर होण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे समजते. आईच्या पसंतीनेच दुसरे लग्न करण्याचे वचन करणने आईला दिले आहे. त्यामुळे आता बिपाशाशी लग्न करण्यासाठी तो आपल्या आईची समजूत काढणार की नव्याने फुलू पाहणाऱ्या या नात्याला कायमचा निरोप देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader