‘नागिन- 3’ फेम अभिनेता पर्ल वी पुरीला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपात अटक केली आहे. पर्लसह ६ जणांवर पास्को कायद्या अंतर्गत अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि वारंवार विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासाठी अभिनेता पर्लला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
पर्लला अटक करण्यात आल्यानंतर टीव्ही विश्वातील अनेक सेलिब्रिटी पर्लच्या बाजूने उभे राहिले आहेत. निर्माती एकता कपूर आणि पर्लची एक्स गर्लफ्रेण्ड करिश्मा तन्ना या दोघींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये एकता आणि करिश्माने पर्लची बाजू सावरत त्याचा बचाव केलाय. एकताने पर्लसोबतचा एक फोटो शेअर केलाय. या पोस्टमध्ये एकताने पर्ल निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. पीडित मुलीच्या आईने एकताला पर्ल निर्दोष असल्याचं सांगितल्याची ती म्हणाली आहे. ” मी एखाद्या अल्पवयीन मुलीचं शोषण करणाऱ्या किंवा अशा प्रकारच्या एखाद्या व्यक्तीला पाठिंबा करेन का? मात्र काल रात्री पासून मी जे पाहिलं ते अयोग्य आहे. माणुसकी इतकी कशी कमी होवू शकते?” असं एकता कॅप्शनमध्ये म्हणालीय.
View this post on Instagram
आणखी वाचा: ‘नागिन ३’ फेम अभिनेता पर्ल वी पुरीला अटक, अभिनेत्यासह सहा जणांवर बलात्काराचा आरोप
पर्लला उगाच खोट्या आरोपांमध्ये गोवलं गेलं
पुढे एकताने पर्लला उगाच खोट्या आरोपांमध्ये गोवलं गेल्याचं म्हंटलं आहे. “पीडित मुलीच्या आईशी अनेक वेळा फोनवर बोलणं झालं. त्या म्हणाल्या की पर्ल यात सहभागी नव्हता. मुलीचे वडिलच खोट्या कहाण्या गुंफत आहेत. सेटवर काम करणारी आई मुलीकडे लक्ष देऊ शकत नाही असं मुलीच्या वडिलांना सिद्ध करायचं आहे.” असं पीडित मुलीच्या आईने सांगितल्याचं एकता म्हणाली आहे.
एकताच्या म्हणण्यानुसार तिच्याकडे पीडित मुलीच्या आईच्या व्हाइस नोटस् आणि मेसेजस आहेत. ज्यामुळे पर्ल पुरी निर्दोष असल्याचं सिद्ध होतं. अलिकडे अनेक जण ‘मीटू मोहिमे’चा चुकीच्या पद्धतीने फायदा घेत असल्याचं म्हणत एकताने नाराजी व्यक्त केली आहे.
पहा फोटो: 5G वापरण्याआधीच २० लाखांचं बील आलेली जूही चावला पहिलीच; पाहा व्हायरल मीम्स
View this post on Instagram
तर अभिनेत्री करिश्मा तन्नाने देखील पर्ल पुरीला पाठिंबा दिला आहे. पर्ल निर्दोष असल्याचं ती म्हणालीय. “मी पर्लसोबत आहे” असं हॅशटॅग देत तीने पर्ल पुरीला सपोर्ट केला आहे. करिश्मा आणि पर्ल एकमेकांना डेट करत होते. मात्र काही काळाने दोघाचं ब्रेकअप झालं.