‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे आर माधवन. या पहिल्यावहिल्या चित्रपटातून आर माधवनने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. त्याच्या एका स्माइलने अनेकांची मने जिंकली. या चित्रपटानंतर आर माधवनने ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खानची बहिण सोहा अली खान मुख्य भूमिकेत होती. चित्रपटात माधवन आणि सोहा यांच्यामधील एका सीनसाठी माधवन सुरुवातीला नकार देत होता.

नुकताच आर माधवनने एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील काही मजेशीर किस्से सांगितले आहेत. रंग दे बसंती चित्रपटात आर माधवनने सोहासोबत किसिंग सीन शूट केला आहे. तो अनुभव सांगत आर माधवन म्हणाला, ‘सोहाला किस करताना सैफ अली खान मला मारत आहे अशी मी कल्पना करत होतो. पण मला एक आदर्श बॉयफ्रेंड असल्याचे सिद्ध करायचे होते. ते सोहाचे देखील पहिले ऑनस्क्रीन किस होते.’ चित्रपटात माधवन सोहाला प्रपोज करतो आणि त्यानंतर किस करतो असा सीन दाखवण्यात आला आहे.

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
Naach Ga Ghuma writer Madhugandha Kulkarni revealed reason behind title
“मन म्हणतंय नाच गं घुमा…” लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांगितली चित्रपटाच्या नावामागची रंजक गोष्ट

आणखी वाचा : ‘चित्रपटाच्या ऑडिशनसाठी कराव्या लागल्या होत्या फोनवर अश्लील गोष्टी तरीही…’, राधिका आपटेचा खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by _Untitled _ (@__untitledd__)

यापूर्वी आर माधवनने ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटात दीया मिर्जा आणि सैफ अली खान यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटात सैफ आणि आर माधवनची भांडणे पाहायला मिळाली होती. अशातच रंग दे बसंतीमध्ये सोहासोबत रोमँटिंक सीन देताना माधवन घाबरला होता असे म्हटले जाते.

‘रंग दे बसंती’ चित्रपटासाठी माधवनला सुरुवातील करण सिंघानियाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. ही भूमिका तमिळ अभिनेता सिद्धार्थने साकारली आहे. तसेच माधवनच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती अभिनेता शाहरुख खानला होती. पण शाहरुख इतर चित्रपटांमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याला या चित्रपटात काम करता आले नाही.