बॉलिवूड अभिनेता आर माधवन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो सोशल मीडियावर नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता आर माधवनने त्याच्या नाही तर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक आणणाऱ्या मिराबाई चानू यांचा फोटो शेअर केला आहे. मीराबाई चानू यांचा जमिनीवर बसून जेवन करतानाचा फोटो आर माधवनने शेअर केला आहे.

आर माधवनने हा फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. एका नेटकऱ्याने मिराबाई चानू यांचा फोटो शेअर केला होता. या फोटोत मिराबाई आणखी दोन व्यक्तींसोबत जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. “ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर मिराबाई चानू मणिपूर येथील तिच्या घरी जेवताना दिसतं आहे. मिराबाई यांना या गरीबीने त्यांचे स्वप्न पाहण्यापासून रोखले नाही,” असे कॅप्शन त्या व्यक्तीने दिले होते. तेच ट्वीट रिट्वीट करत आर माधवन म्हणाला, “हे खरं असू शकतं नाही, हे सगळं पाहून आता माझ्याकडे शब्द नाहीत.”

या आधी मिराबाई यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोत मिराबाई आणि त्यांच्या समोर जेवनाचा ताट दिसतं आहे. हा फोटो शेअर करत “दोन वर्षांनंतर घरचं जेवन मिळतं तेव्हा चेहऱ्यावर असा आनंद दिसतो”, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

 

View this post on Instagram

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu)

मिराबाई चानू यांना वेटलिफ्टिंगच्या ४९ वजनाच्या गटात रौप्य पदक मिळालं आहे. त्यानंतर मिराबाईने एका मुलाखतीत त्यांनी पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर डोमिनोजने मिराबाई यांना आयुष्यभर फ्री पिझ्झा देणार असल्याचे सांगितले.