बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे सिनेमांतील तिच्या दमदार अभिनयासोबतच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. राधिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते. आजवर राधिकाने अनेक सिनेमांमध्ये देखील बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर आता राधिकाने नुकतच केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आलं आहे.
राधिका आपटेने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राधिकाचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. राधिकाने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली असून त्यावर एक लेदर जॅकेट घातलंय. यासोबतच तिने गळ्यात एक गोल्डन नेकलेस घातला आहे. राधिकाचा हा ग्लॅमरस लूक चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
हे देखील वाचा: “… बस काटते हैं”; रिलीज होताच ‘कुत्ते’ सिनेमाच्या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा
या फोटोवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी फायरचे इमोजी देत राधिका या फोटोत मादक दिसत असल्याचं म्हंटलंय. तर काही नेटकऱ्यांनी या फोटोत राधिका ‘मनी हाइस्ट’ वेब सीरिजमधील नैरोबी सारखी दिसत असल्याच्या कमेंट केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच राधिका तिच्या ‘पार्च्ड’ सिनेमातील न्यूड सिनेमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली होती. यावेळी सोशल मीडियावर राधिका आपटे आणि तिच्या सिनेमांवर बंदी घालण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली होती.