बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे आणि ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या चित्रपटातील अभिनेता देव पटेल यांचा लवकरच ‘द वेडिंग गेस्ट’ हा चित्रपटत येणार आहे. या चित्रपटाद्वारे राधिका आणि देव पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटात एका ब्रिटीश मुस्लीम मुलाचा म्हणजेच देव पटेलचा पाकिस्तान ते भारत असा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

राधिका आणि देव त्यांचा आगामी चित्रपट ‘द वेडिंग गेस्ट’चे जोरदार प्रमोशन करत आहेत. चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु आता हा चित्रपट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच चित्रपटातील राधिका आणि देव यांचा एक बोल्ड सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aishwarya Rai Bachchan leaves for Cannes with Aaradhya
जखमी ऐश्वर्या राय बच्चन कान फिल्म फेस्टिव्हलसाठी रवाना; लेक आराध्याने उचलली आईची बॅग, व्हिडीओ व्हायरल
Rohit Sharma Tilak Varma Mumbai Indians Video
‘काय हिरो, गार्डनमध्ये आला आहे का?’ तिलक वर्माचं उत्तर ऐकून रोहित शर्माच झाला चकित, VIDEO व्हायरल
Parth Jindal Reaction on sanju samson wicke
DC vs RR : सामन्यादरम्यान झालेल्या जोरदार वादानंतर संजू सॅमसन आणि पार्थ जिंदालचा न पाहिलेला VIDEO आला समोर
Bengaluru metro video
Viral Video : बंगळुरू मेट्रोमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, पोलिसांनी घेतली दखल; म्हणाले…
Sreesanth lied about sanju samson to Rahul Dravid Video
VIDEO: संजू सॅमसनचं आयुष्य बदलून टाकणारं श्रीशांतचं ते वाक्य
Henrich Klassen Left Fuming after Mobbed by SRH Fans in Hyderabad Mall
IPL 2024: हैदराबादमध्ये चाहत्यांनी क्लासेनला घेरलं, त्रस्त झालेला हेनरिक गर्दीवर चांगलाच भडकला, व्हीडिओ व्हायरल
Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Dhruv Rathe and his wife juli
‘ध्रुव राठीचं नाव रशीद, पत्नी पाकिस्तानी, दाऊदशी संबंध?’, व्हायरल मेसेजनंतर ध्रुव म्हणाला…

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार राधिकाला या बोल्ड सीन लीक होण्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर तिच्यासोबत देव असतानाही हा सीन ‘राधिकाचा बोल्ड सीन’ म्हणून का चर्चेत आहे ? असा प्रश्न राधिकानेच उपस्थिच केला. ‘द गेस्ट वेडिंग या चित्रपटात आणखी खूप सुंदर सीन आहेत. परंतु लोकांच्या मानसिकतेमुळे फक्त बोल्ड सीन लीक झाला आहे. या सीनमध्ये माझ्यासोबत देव पटेल देखील आहे. पण सीन माझ्या नावानेच लीक होत आहे. पुरुष अभिनेता देव पटेल याच्या नावाखाली हा सीन का लीक झाला नाही’ असे प्रश्न राधिकाने उभा केला. या आधीही राधिकाचा पार्च्ड (Parched) या चित्रटातील आदिल हुसैनसोबतचा बोल्ड सीन लीक झाला होता.