राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात रोज नवनवे धक्कादाय खुलासे समोर येत आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यापासूनच अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींनी पुढे येत राज कुंद्रावर आरोप केले आहेत. यातच आता राज कुंद्राच्या हॉटशॉट अ‍ॅपसाठी आणि अडल्ट सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री झोया राठोडने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत झोयाने तिला राज कुंद्राकडून अश्लील चित्रपटसाठी ऑफर मिळाल्याचं सांगितलं आहे.

राज कुंद्राचा सहकारी उमेश कामतने झोयाला हॉटशॉट अ‍ॅपवरील अश्लीलल सिनेमात काम करण्यासाठी अनेकदा फोन केल्याचं ती म्हणाली. राज कुंद्राला अटक होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये उमेश कामत झोयाला सतत फोन करून अश्लील सिनेमात काम करण्यासाठी मनधरणी करत होता. झोया म्हणाली, ” ऑफिसमध्ये ऑडिशन घेण्याएवजी त्याने व्हाट्सअपवरून न्यूड ऑडिशन देण्यास सांगितलं. आपण शहराबाहेर असल्याचं कारण देत त्याने न्यूड व्हिडीओ व्हाटस्अपवर पाठवण्याचा आग्रह धरला होता. मी नकार दिल्यानंतरही तो सतत फोन करत होता.” असं झोया म्हणाली आहे.

हे देखील वाचा: अभिनेत्री शिल्पा शेट्टीची हायकोर्टात धाव; मीडियामधील रिपोर्टिंगबाबत दाखल केली याचिका

जेव्हा झोयाने स्क्रिप्ट न वाचता ‘न्यूड ऑडिशन’ देण्नयास नकार दिला तेव्हा राजचा सहकारी उमेश कामत तिला ऑफर स्वीकारण्यासाठी सतत त्रास देत असल्याचं ती म्हणाली. अश्लील सिनेमात काम करण्यासाठी उमेशने दररोज २० हजार रुपये मिळतील अशी ऑफर झोयाला दिली होती. अटक होईपर्यंत तो झोयाला सतत कॉल करत होता.

अश्लील सिनेमांसाठी दररोज ७० हजार रुपयांची ऑफर

तसचं हॉटशॉट अ‍ॅपसाठी काम करणाऱ्या एका रॉय नावाच्या व्यक्तीने देखील झोयाला अश्लील सिनेमांमध्ये काम करण्यासाठी फोन केल्याचं ती म्हणाली आहे. या रॉय नावाच्या व्यक्तीने आपण युकेमध्ये राहत असल्याचं तिला सांगितलं होतं. तसचं हॉटशॉट अ‍ॅपसाठी आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूड वेब सीरिज बनवत असल्याचं तो झोयाला म्हणाला होता असं तिने स्पष्ट केलं. रॉयने झोयाला दररोज ७० हजार रुपये देणार असल्याची ऑफर दिल्यानंतर झोया या कामासाठी तयार झाली. राज कुंद्राच्या अटकेनंतर उमेश कामत राजसाठी काम करायचा हे कळाल्याचं झोया म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झोया राठोडने या आधी सौभाग्यवती भव आणि फियर फाइल्स या सारख्या मालिकांमध्ये काम केलंय. न्युफ्लिक्स अ‍ॅपच्या एका बोल्ड शोमध्ये झोयाने यश ठाकूरसोबत काम केलंय. यश ठाकूर आणि राज कुंद्राचा संबध असल्याची आपल्याला कल्पनादेखील नव्हती असा खुलास तिने केलाय.