अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस तपास करत असून आता पोलिसाच्या हाती राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांमधील व्हॉट्सअप चॅट हाती लागलं आहे. या चॅटमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

राज कुंद्राच्या या व्हाट्सअप चॅटमुळे अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून यामुळे अश्लील सिनेमा आणि पॉर्नोग्राफी अ‍ॅपमधून राजकुंद्रा किती पैसे कमवायचा हे देखील समोर आलं आहे. या माहिती नुसार राज कुंद्रा आणि त्याच्या काही सहकार्यांनी कामासाठी एक व्हाटस्अप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपचं नाव ‘एच’ असं होतं. राज कुंद्राच या ग्रुपचा अ‍ॅडमिन होता. या ग्रुपवर राज पॉर्न सिनेमा बनवणारऱ्या कंपनीचा चेअरमन प्रदीप बक्शीसोबत पैशाचे व्यवहार आणि कटेंटबद्दल चर्चा करायचे. या चॅटमधून राज कुंद्रा अश्लील सिनेमाच्या निर्मितीतून दिवसाला लाखो रुपये कमवत असल्याचं उघड झालंय.

राज कुंद्रा पॉर्नोग्राफीमधून दिवसाला कमावयाचा लाखो रुपये

या चॅटनुसार राज कुंद्रा ‘हॉटशॉट’ या पॉर्नोग्राफी अ‍ॅपवरील लाईव्हमधून दररोज १ लाख ८५ हजार रुपयांची कमाई करत असल्याचं उघड झालं आहे. तर या अ‍ॅपवरील अश्लील व्हिडीओमधून दररोज तो ४ लाख ५३ हजार रुपयांची कमाई करत होता. २०२० सालापर्यंत ‘हॉटशॉट’ या पॉर्नोग्राफी अ‍ॅपचे २० लाखांहून अधिक सबस्क्रायबर होते. या बिझनेसमध्ये एकूण ८ ते १० कोटींची उलाढाल होत असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर-४’ शोमधून बाहेर?; ‘ही’ अभिनेत्री घेणार शिल्पाची जागा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय या ग्रुपमध्ये किती बिझनेस झाला, किती तोटा झाला या सर्व गोष्टींवर चर्चा होत असल्याचं उघड झालं आहे. यात प्रदीपने राजला पॉर्न सिनेमात काम करणाऱ्यांचे पैसे देण्याबद्दर चॅट केलं आहे. यातच राजने ८१ कलाकारांचे पैसे थकवले असल्याचं देखील चॅटमधून समोर आलं आहे. या चॅटमुळे अनेक गोष्टींचा उलगडा झाल्याने आता राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.