बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे लक्ष हे पॉर्नोग्राफी प्रकरणातून मिळणाऱ्या कमाईकडे आहे. राज कुंद्रापासून या प्रकरणात असलेल्या सर्व आरोपींच्या बॅंक अकाऊंट्सची तपासनी सुरु आहे. सगळ्यांचे बॅंक अकाऊंट्स हे फ्रीज करण्यात आले आहेत. आता या प्रकरणात मॉडेल आणि अभिनेत्री सागरिका शोना सुमनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या पॉर्न चित्रपटच्या चित्रीकरणातून अभिनेते आणि अभिनेत्री कोट्यवधी रुपयांची कमाई केली असे सागरिकाने सांगितले आहे.

सागरिका शोना सुमनला मुंबई गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले होते. सागरिका त्या लोकांपैकी एक आहे ज्यांनी फेब्रुवारी महिन्यातच राज कुंद्रावर पॉर्न चित्रपटांविषयी खळबळजनक आरोप केले होते. सागरिकानेच हॉटशॉट्स अॅपचे मूळ मालक हा राज कुंद्रा असल्याचा दावा केला होता. या पॉर्न चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेता आणि अभिनेत्रींची कमाई ही कोट्यवधी असल्याचे, सागरिकाने सांगितल्याचे ‘नवभारत टाइम्स’ने सांगितले आहे.

Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Aishwarya Narkar
मालिका संपल्यानंतर कोकणात पोहोचल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर केला स्वयंपाक; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..
Geo Studios Stree 2 movie Oscar Entertainment news
जिओ स्टुडिओजला नवी झळाळी…नव्या वर्षात रंजक चित्रपटांसह सज्ज
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
who is nana patekar wife nilkanti patekar
नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट
Sharayu Sonawane
Video : ‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; श्वेता खरात कमेंट करत म्हणाली…
Rashmika Mandanna Was Engaged To Actor Rakshit Shetty
रश्मिका मंदानाने १३ वर्षांनी मोठ्या ‘या’ अभिनेत्याशी केलेला साखरपुडा; ब्रेकअपनंतर आता कसं आहे दोघांचं नातं? जाणून घ्या

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

सागरिका म्हणाली की, ‘ज्या नंदिता दत्ता म्हणजेच नॅंसी भाभीला काही दिवसांपूर्वी कोलकाता पोलिसांनी अटक केली होती, ती दरमहा ३० ते ३५ लाख रुपये कमवत होती. एवढंच नाही तर पॉर्न व्हिडीओपासून ते ऑनलाईन शो आणि व्हिडीओ क्लिपमध्ये काम करत नंदिताने एका वर्षात ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. नंदिता दत्ता, टीना नंदी आणि झोया राठोड सारख्या अभिनेत्रींनी या पॉर्न चित्रपटात काम करून प्रत्येक महिन्याला लाखो रुपये कमवले आहेत. या सगळ्यांनीच वार्षिक २ ते ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.’

आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका

या सगळ्यांना पीडित समजण्याची चूक करू नका असे आवाहन सागरिकाने पोलिसांना केले आहे. सागरिका पुढे म्हणाली की, ‘गेल्या २ ते ३ वर्षात या अभिनेत्रींनी शेकडो पॉर्न चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. लॉकडाऊनमध्ये सगळे व्यवसाय बंद असतानाही, पॉर्न चित्रपटाचा व्यवसाय चांगला चालला होता.  ढ आयलँडमधील एका बंगल्यावर या चित्रपटांचे चित्रीकरण हे होत होते. एक व्हिडीओ शूट करण्यासाठी ६ तासांचा कालावधी लागतो. यामध्ये सेक्स सीन्सचा समावेश होता.’

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

पुढे सागरिका म्हणाली, ‘हे पोर्न स्टार आहेत. या लोकांनी दरमहिन्याला १५ लाख ते २५ लाख रुपये कमवले आहेत. टीना नंदी आणि सोनिया माहेश्वरी सारख्या अभिनेत्री ६ तासांच्या पॉर्न चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ६० हजार ते ९० हजार रुपये घेतात. या चित्रीकरणादरम्यान सेक्स सीन्सचे चित्रीकरणही करण्यात आले. तर लॉकडाऊनमध्ये काही कलाकारांनी एका दिवसाच्या शूटिंगसाठी १.५ लाख ते ५ लाख रुपये घेतले आहेत.’

Story img Loader