बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने या प्रकरणी राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणी मॉडेल आणि अभिनेत्री श्रुती गेराने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
श्रुतीने नुकतीच ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने राज कुंद्रा प्रोड्युस करत असलेल्या एका सीरिजसाठी २०१८मध्ये तिला फोन आला होता असा खुलासा केला आहे. पण श्रुतीने या सीरिजमध्ये काम करण्यास नकार दिला होता.
आणखी वाचा : ‘अॅपसाठी त्याने मला…’, राज कुंद्राच्या अटेकनंतर यूट्यूबरचा गौप्यस्फोट
View this post on Instagram
‘२०१८मध्ये मला सीरिजसाठी ऑफर केली होती. तेव्हा हा प्लॅटफॉर्म सुरु देखील झाला नव्हता. मला माझ्या मॅनेजरने सांगितले की कास्टिंग दिग्दर्शकाचा फोन आला होता. मला सांगण्यात आले होते की शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे यूके बेस प्रोडक्शन हाउस येणार आहे. त्यांना नव्या चेहऱ्यांना लाँच करायचे आहे. म्हणून ते अनेकांना भेटत आहेत. ते चांगला कंटेन्ट देणार आहेत असे सांगण्यात आले. त्यानंतर मला मिटिंगसाठी बोलावण्यात येणार होते’ असे श्रुती म्हणाली.
पुढे श्रुतीला तिने ऑफरला नकार का दिला असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने, ‘मी १०० जाहिराती, २ फिचर चित्रपट, कान्स चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेल्या एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. मला वेब सीरिजमध्ये काम करण्यात रस नाही. कारण त्यामध्ये अश्लीलता असते. तसेच अपशब्द वापरले जातात. मी आजवर ज्या जाहिरातींमध्ये काम केले त्या अतिशय प्रोफेशनल आहेत. त्यांनी योग्य पद्धतीने ऑडिशन घेतले आणि त्यानंतर फोन करुन बोलावले. चाचण्या घेतल्या आणि नंतर निवड करण्यात आली. राज कुंद्राच्या सीरिजसाठी त्यावेळी मी नकार दिला. ते काय कंटेन्ट लोकांना देतात हे मला पाहायचे होते.’