करोनाचं संकट सध्या संपूर्ण जगावर थैमान घालत आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे मालिकांचं शूटिंगही थांबलं आहे. या कठीण काळात सर्वच वाहिन्यांवर मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु झालं आहे. मात्र लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवरील राजा शिवछत्रपती ही लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. वाहिनीच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका पुन्हा सुरू केल्यानंतर ‘राजा शिवछत्रपती’ मालिकासुद्धा पुन्हा सुरू करण्यात यावी अशी जोरदार मागणी होऊ लागली. त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीने ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याचसोबत ‘आंबटगोड’ हीसुद्धा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुक्रवार ३ एप्रिलपासून दररोज सायंकाळी ५ वाजता आंबटगोड आणि ५.३० वाजता राजा शिवछत्रपती या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक पिढीला भविष्यातील नवे क्षितिज गाठण्यासाठी सदैव प्रेरणा देत असतो. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केलं आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्द केलेले मालिकेचं शीर्षकगीत प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामनात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज, मृणाल कुलकर्णी यांच्या जिजाऊ, अविनाश नारकर यांचे शहाजी राजे, यतीन कार्येकर यांचा औरंगजेब आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हेच सोनेरी क्षण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raja shiv chhatrapati marathi serial to re telecast on star pravah soon ssv