दक्षिणेतील चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रजनीकांत लवकरच एका मराठी चित्रपटात काम करणार आहेत. आजवर मोठ्या बजेटचे चित्रपट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रजनीकांत यांनी आजवर एकाही मराठी चित्रपटात काम केलेलं नाही. पण, त्यांच्या चाहत्यांची ही इच्छाही लवकरच पूर्ण होणार आहे.

वाचा : ‘गुगल डुडल’द्वारे व्ही. शांताराम यांना अनोखी मानवंदना….

‘पसायदान’ या मराठी चित्रपटात ते काम करणार आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते मामुटी हेदेखील दिसतील. बाळकृष्ण सुर्वे या चित्रपटाची निर्मिती करत असून, दिपक भावे दिग्दर्शन करणार आहेत. दिपकने लिहिलेल्या ‘इडक’ चित्रपटाची ‘इफ्फी’मध्ये निवड झाली आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे बाळकृष्ण सुर्वेंनी सांगितले.

वाचा : ‘पद्मावती नर्तिका नव्हती, ती राणी होती’

रजनीकांत हे मूळचे महाराष्ट्रीय आहेत. शिवाजीराव गायकवाड हे त्यांचे खरे नाव. रामोजी राव आणि जिजाबाई गायकवाड या महाराष्ट्रीय दाम्पत्याच्या चार मुलांपैकी सर्वात धाकटा मुलगा म्हणजेच शिवाजीराव गायकवाड. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगळुरु येथील म्हैसूरमध्ये म्हणजे आताच्या कर्नाटक राज्यात झाला. रजनीकांत यांना दोन मोठे भाऊ आणि एक बहीण होती.