‘न्यूटन’, ‘बरेली की बर्फी’, ‘ट्रॅप्ड’ या चित्रपटांना प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही वाहवा मिळाल्याने अभिनेता राजकुमार रावसाठी हे वर्ष आनंददायी ठरलं असं म्हणायला हरकत नाही. चौकटीबाहेर जाऊन नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारण्याला तो प्राधान्य देतो. हे वर्ष संपत नोही तोवर त्याला आणखी एक चित्रपट मिळाला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत नव्या चित्रपटात झळकणार असल्याची माहिती त्याने ट्विटरवरून चाहत्यांना दिली.

‘श्रद्धा कपूरसोबत चौकटीबाहेरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटात काम करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे,’ असं त्याने ट्विटरवर सांगितलं. राज आणि डीके या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘अ जंटलमन’, ‘गो गोवा गॉन’, ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन याच जोडीने केले होते.

PHOTO : पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात दिसली सुहाना

राजकुमारला या इंडस्ट्रीत जवळपास सात वर्ष झाली आणि अवघ्या सात वर्षांच्या करिअरमध्ये त्याने एक राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा पटकावला. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शाहिद’ या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला. त्यानंतर ‘न्यूटन’, ‘बरेली की बर्फी’ हे चित्रपट आणि ‘बोस : डेड ऑर अलाइव्ह’ या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयाची सर्वांकडून प्रशंसा झाली.

TOP 10 NEWS : धर्मेंद्र यांनी बिग बींवर साधलेल्या निशाण्यापासून कंगना रणौतच्या स्पष्टीकरणापर्यंत सर्वकाही एका क्लिकवर…

पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तो एका हटके भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे राजकुमार आणि श्रद्धा ही नवी जोडी पडद्यावर काय कमाल करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.