प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलेला आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या शोमधील सर्वच पात्र त्यांच्या हटके भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उरतली आहेत. खास करून शोमधील जेठालाल. पण तुम्हाला माहित आहे का या शोमधील जेठालालच्या भूमिकेसाठी लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादवला विचारणा करण्यात आली होती. मात्र राजपालने जेठालाल गडा या भूमिकेसाठी नकार दिला होता. नुकत्याच एका मुलाखतीत राजपाल यादवने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अभिनेते दिलीप जोशी साकारत असलेली जेठालाल ही भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली असून जेठालालला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राजपाल यादवला जेठालाल भूमिकेला नकार दिल्याची खंत वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. रेडीओ होस्ट सिद्धार्थ खन्नाच्या प्रश्नावर राजपाल यादव म्हणाला, “नाही नाही..जेठालाल हे पात्र एका चांगल्या कलाकाराला आणि अभिनेत्याला देण्यात आलं आहे. आणि मी प्रत्येक पात्राला त्या कलाकाराचं पात्र मानते.” असं म्हणत राजपालने दिलीप जोशी याचं कौतुक केलं.

हे देखील वाचा: “पैसै कसे कमवता?”; ‘द कपिल शर्मा शो’मधील राज कुंद्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पुढे राजपाल यादव म्हणाला, ” आम्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात आहोत. त्यामुळे मला कोणत्याही कलाकाराच्या भूमिकेत स्वत:ला पाहण्याची आवश्यकता भासत नाही. तसचं मला वाटतं माझ्यासाठी म्हणजेच राजपाल यादवसाठी तयार केलेल्या भूमिका मला मिळो. मात्र एखाद्या अभिनेत्याने मोठ्या कष्टाने लोकप्रिय ठरवलेली भूमिका साकारण्याची माझी इच्छा नाही.” असं म्हणत जेठालालची भूमिका नाकारण्याचं आपल्याला अजिबात दु:ख नसल्याचं राजपाल यादवने स्पष्ट केलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजपाल यादवने बॉलिवूडमधील ‘चूप चूप के’, ‘मुझसे शाही करोगी’, ‘भुलभुलैया’ या सारख्या अनेक सिनेमांमध्ये धमाल विनोदी भूमिका साकारात प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. लवकरच तो ‘हंगामा-२’ सिनेमात झळकणार आहे.