रामायणकार वाल्मिकी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर राखी सावंतविरोधात लुधियाच्या न्यायदंडाधिकारी कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यामुळे राखीने बुरखा घालून सर्वांशी लपून गुरुवारी कोर्टात हजेरी लावली होती. आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी तिने बुरख्याचा आधार घेतला होता. कोर्टात हजर झाल्यानतंर न्यायाधीश विश्व गुप्ता राखीला जामीन मंजूर केला. कोर्टाने प्रत्येकी एक लाख रुपयांच्या दोन जात मुचलक्यांवर राखीला जामीन मंजूर केला. त्यानंतर ती मुंबईला रवाना झाली.

थलायवा रजनीकांत यांचा पहिला सेल्फी व्हिडिओ पाहिलात का?

राखीवर वाल्मिकी समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. तिने २०१६ मध्ये महर्षी वाल्मिकींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबतची सुनवणी ११ मे रोजी होणार होती, पण राखी न्यायालयात आलीच नाही. त्यामुळे न्यायालयाने तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच ७ जुलैच्या आधी राखी सावंतला कोर्टात हजर राहण्याची ताकीदही देण्यात आली होती.

https://www.instagram.com/p/BV2f-ORjXpE/

याआधी राखीने याप्रकरणी माफीही मागितली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राखीने वाल्मिकी समाजाविषयी बोलताना वाल्मिकींचा उल्लेख ‘मारेकरी’ म्हणून केला होता. तिने मिका सिंग आणि वाल्मिकी यांची तुलना करत म्हटले होते की, प्रत्येक माणूस बदलतो. सुरुवातीला वाल्मिकी हेही लोकांची हत्या करायचे. पण नंतर त्यांनी रामायण लिहिले ना? तिच्या या वक्तव्यामुळे राखीवर वाल्मिकी समाजाचा राग ओढवला होता.