बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून अभिनेत्री राखी सावंत ओळखली जाते. राखी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखी एका माणसावर संतापल्याचे दिसतं आहे.

राखीचा हा व्हिडीओ ‘व्हुमपला’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखी ऑफ कॅमेरा असलेल्या एका व्यक्तीला फटकारताना दिसते. “काका तुम्ही जा. मी मुलाखत देत आहे. तुम्ही काय बघतं आहात? मुलगी कधी बघितली नाही का? पुढे जा,” असे राखी बोलते. त्यानंतर ते काका राखीकडे बघत तिथून दुचाकी घेऊन निघाले आणि त्यांचा अपघात होणार तेवढ्यात राखी म्हणाली, माझ्याकडे नाही तिकडे बघा नाही तर अपघात होईल तुमचा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

याचवेळी राखी अभिनेता पर्ल व्ही पुरीला अटक केल्या बद्दल ही बोलली आहे. राखीने सांगितले की पर्लने कोणाचा विनयभंग केला यावर मी विश्वास करू शकतं नाही. ती मुलगी त्यांना धमकावत पण असू शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

आणखी वाचा : मनी हाइस्ट ५ : ‘हे एक मोठ युद्ध असेल..’, बर्लिन अर्थात पेद्रो अलोन्सोने उलगडला सस्पेन्स

काही दिवसांपूर्वी राखी तिच्या मस्तानी लूकमुळे चर्चेत होती. त्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी राखीला ट्रोल केले होते. राखी म्हणाली होती की, ती तिच्या बाजीरावला शोधते. ‘नच बलिये’ हा शो बंद झाल्यामुळे आता ती रितेशला देखील भेटू शकणार नाही.

Story img Loader