महिला सबलीकरणासाठी नेहमीच आग्रही असणारा अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या कुटुंबातही या गोष्टीवर भर दिला होता. तोही अगदी सुरुवातीपासूनच. कोषात न राहता महिलांनीसुद्धा परिस्थितीचा सामना करावा याची सुरुवात खिलाडी कुमारने स्वत:च्या बहिणीपासूनच केली होती. याचीच एक झलक त्याने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. रक्षाबंधन म्हटलं की, बहिणीचं रक्षण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो वगैरे वगैरे.. अशा ज्या काही समजुती आहेत त्या मोडित काढणारा हा व्हिडिओ सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. #DirectDilSe असा हॅशटॅग देत त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत अक्षयची बहिण त्याला राजीव म्हणून संबोधत आहे. कारण, अक्षय कुमारचं खरं नाव राजीव भाटीया असून घरातले त्याला प्रेमाने ‘राजू’ म्हणून संबोधतात. या व्हिडिओत ती म्हणतेय, ‘मी सारखी हसत असायचे. मला राग यायचाच नाही आणि आला तरीही मला राजूवरच राग याचचा. कुठे लांब पार्टीसाठी जायचं झालं तर राजूसोबत जा असं आई- बाबा सांगायचे. पण, तो त्यांचं ऐकायचाच नाही. माझी काळजी मी स्वत:च घ्यावी असंच त्याचं म्हणणं होतं. वडिलांच्या निधनानंतर राजू कधी त्यांच्या भूमिकेत आला हे माझं मलाच कळलं नाही. पण, स्वत:ची काळजी घेण्याचा आग्रह काही त्याने सोडलाच नाही.’

balmaifal, story for kids, story of dog and his names, pet dog, dog names, what is in name, dog love, dog story, marathi article, marathi story, marathi story for kids, loksatta balmaifal,
बालमैफल : नावात काय आहे
Eknath shinde and sharad pawar
“मग शरद पवारांवर ही वेळ का आली?” ‘शपथनामा’वरून एकनाथ शिंदेंची बोचरी टीका, म्हणाले…
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
Ulta-Chashma
उलटा चष्मा: नेहरू नव्हेत, बोस..!

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

अक्षय नेहमीच स्वत:ची जबाबदारी, काळजी घ्यायला शिका असं म्हणताना दिसतो. याचा प्रत्यय त्याच्या बहिणीला तेव्हाच आला ज्यावेळी तिची मुलगी शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. त्यावेळी ‘मला अक्षयचं म्हणणं पटलं. स्वत:ची काळजी आणि स्वत:ची जबाबदारी स्वत:च घेतली पाहिजे हे राजूचं म्हणणं म्हणजेच त्याने मला दिलेली सर्वात मोठी ताकद आहे’, असं ती म्हणाली. भाऊ म्हणून विविध प्रकारच्या भेटवस्तू, सौंदर्यप्रसाधनं किंवा मग पैसे ओवाळणीत देण्यापेक्षा खिलाडी कुमारने खऱ्या अर्थाने त्याच्या बहिणीला एका वेगळ्याच पद्धतीने सक्षम केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.