रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी आता सर्व बहिण- भाऊ सज्ज झाले आहेत. अशा या वातावरणात सेलिब्रिटी भाऊ- बहिणींच्या जोड्यांमध्येही हा उत्साह पाहायला मिळतोय. या सर्व वातावरणात अभिनेता सलमान खान आणि त्याच्या बहिणींच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनवरही अनेकांचच लक्ष आहे. भाईजान सलमानच्या दोन बहिणी आहेत हे तर सर्वांना ठाऊक आहे. पण, अर्पिता आणि अलविराशिवाय त्याला आणखी एक बहिण आहे. तिचं नाव आहे, श्वेता रोहिरा.

सामाजिक कार्यकर्ती श्वेता रोहिरा दरवर्षी सलमानला राखी बांधते. लहानपणापासूनच ती हा सण दबंग अभिनेत्यासोबतच साजरा करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्वेताचे वडील सोनू आणि सलमान खान एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. श्वेताच्या वडिलांनंतर निधनानंतर सलमानने तिची आणि तिच्या भावाची फार काळजी घेतली. कठीण प्रसंगात त्यांना साथ दिली. इतकच नव्हे तर, २०१४ मध्ये अभिनेता पुलकित सम्राटसोबत श्वेताचं लग्न झालं होतं त्यावेळी सलमाननेच तिचं कन्यादान केलं होतं.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

श्वेता आणि पुलकितच्या नात्याची सुरुवात सलमानने करुन दिली खरी. पण, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर अवघ्या काही वर्षांतच त्यांच्या नात्याला तडा गेला. असं असलं तरीही सलमान आणि पुलकितच्या मैत्रीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाहीये. हिंदी चित्रपटसृष्टीत पुलकितच्या कारकिर्दीत सलमानचा मोलाचा वाटा असल्याचं म्हटलं जातं. सलमानच्या घरी आयेजित करण्यात येणाऱ्या बऱ्याच कार्यक्रमांना श्वेता आवर्जुन हजेरी लावते. अर्पिताच्या लग्नापासून ते अगदी खान कुटुंबियांच्या ईद सेलिब्रेशनपर्यंत सर्वच कार्यक्रमांना श्वेता हजेरी लावते.

https://www.instagram.com/p/BV1ywUAg87S/