अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. परंतु यावेळी तिने पोस्ट केलेल्या नव्हे तर इतर कोणी पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे ती चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क दारु खरेदी करत असल्याचा दावा केला जात आहे.
Oh wow ! I wasn’t aware that medical stores were selling alcohol https://t.co/3PLYDvtKr0
— Rakul Singh (@Rakulpreet) May 7, 2020
रकूलचा हा व्हिडीओ केआरके बॉक्सऑफिस या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये ती एका मेडिकल स्टोअरमधून काहीतरी घेउन येताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी तिने दारु खरेदी केली का? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर आता स्वत: रकूलने प्रतिक्रिया दिली आहे. “मला खरंच माहित नव्हतं की मेडिकल स्टोअरमध्ये दारु देखील मिळते.” अशा आशयाचे ट्विट करुन रकूलने हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याचीच फिरकी घेतली आहे.
हा व्हिडीओ मार्च किंवा एप्रिल महिन्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण लॉकडाउनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दारुची दुकानं बंद होती. याच दरम्यान काही ठिकाणी मेडिकल स्टोअरमधून दारु विक्री केली जात असल्याच्या अफवाही पसरवल्या गेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रकूलने देखील मेडिकलमधून दारु खरेदी केली का? असा प्रश्न विचारला जात होता. परंतु तिच्या उत्तराने सर्वच ट्रोलर्स आता शांत बसले आहेत.