संपूर्ण देशात सध्या टिक-टॉकचा बोलबाला आहे. टिक-टॉकचा व्हिडीओ बनवणारा एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात असून त्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपनंतर आता सर्वांना टिक- टॉकचे वेड लागले आहे. याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेल्या अभिनेत्री मंदाकिनीचा एक टिक-टॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

या व्हिडीओत मंदाकिनी एका तरुणीसोबत ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील ‘सुन साहिबा सुन’ या गाण्याचे बोल बोलताना दिसत आहे. टिक-टॉकवर या व्हिडीओला ८५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. ‘इतक्या वर्षांनी तुम्हाला पाहून खूप आनंद झाला’, ‘सर्वांत आवडती अभिनेत्री’ अशा शब्दांत नेटकरी त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.

When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
Virat Kohli and Kagiso Rabada Video Viral
PBKS vs RCB : कगिसो रबाडाच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने मारली अचानक एन्ट्री, VIDEO होतोय व्हायरल
Sreesanth lied about sanju samson to Rahul Dravid Video
VIDEO: संजू सॅमसनचं आयुष्य बदलून टाकणारं श्रीशांतचं ते वाक्य
Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO
Pakistani youTuber viral video
VIDEO: लाइफस्टाइल ब्लॉगरचा उच्छाद थांबेना! पाकिस्तानी यूट्यूबरने बहिणीच्या मृत्यूनंतर केलेलं ‘हे’ कृत्य पाहून प्रेक्षकही भडकले
due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील मंदाकिनीचा साधाेभोळापण, तितकाच मादक अंदाज अनेकांची मनं जिंकून गेला. बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत दिसेल अशी अनेकांचीच अपेक्षा होती. पण, नियतीच्या मनात मात्र वेगळीच खेळी होती. कुख्यात डॉन दाऊदशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे म्हटले गेले होते. दाऊदसोबत नाव जोडले जात असल्याच्या चर्चांना उधाण येताच मंदाकिनी एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दूर गेली.