टॉलिवूड स्टार राणा डग्गुबती हे नाव घेतलं की आता त्यासोबत त्याची विशेष ओळख लिहावी लागत नाही. तुमच्या काही भूमिकाच तुम्हाला अजरामर करतात याचाच प्रत्यय बाहुबलीच्या प्रत्येक कलाकाराला आला असेल. बाहुबली सिनेमाचे यश मागे टाकून आता प्रत्येक कलाकार त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र झाला आहे. राणानेही त्याच्या आगामी १९४५ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. आतापर्यंत आपण राणाला दाढी असलेल्या रांगड्या लूकमध्ये पाहिले आहे. या सिनेमात राणा चक्क दाढी नसलेल्या लुकमध्ये दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/BaoTG6aliNi/
आपल्या या नवीन लूकचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला पण सुरूवातीला तो राणाच आहे हे कोणीही ओळखू शकले नाही. त्याचे चाहते तर सोडाच पण त्याच्या घरातल्यांनीही त्याला ओळखले नाही. आतापर्यंत राणाने थोडी का होईना दाढी आणि मिशी ठेवली होती. पण या सिनेमासाठी त्याने फक्त मिशीच ठेवली आहे. एवढी वर्ष त्याला दाढी मिशीत पाहत आल्यामुळे मूळ राणा कसा दिसतो हे बहूधा त्याच्या घरातले आणि त्याचे चाहते विसरले होते. या सिनेमाच्या निमित्ताने का होईना त्यांना पुन्हा जुना राणा आठवला असेल हे मात्र नक्की.
Introducing team 1945 Director @Sathyasivadir and DoP @DoPsathya pic.twitter.com/xa4PIYAjBW
— Rana Daggubati (@RanaDaggubati) October 24, 2017
आपल्या या नव्या लूकविषयी सांगताना राणा म्हणाला की, ‘सुरुवातीला मलाही स्वतःकडे पाहताना आश्चर्य वाटायचे. काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला ओळखलेच नाही. अनेकांनी तर हा कोण? असा प्रश्नही विचारला.’ राणाचा आगामी सिनेमा हा स्वातंत्र्यपूर्व काळातला असणार आहे. यात तो सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेतील एक सैनिक दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा मदाई थिरांथू या नावाने तामिळमध्येही डब करण्यात येणार आहे. सत्य सिवा यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात सत्यराज, नसीर आणि आरजे बालाजी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.