बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ असलेला अभिनेता रणबीर कपूर याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा आतापर्यंत ऐकावयास मिळाल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला तो डेट करत असल्याचेही वृत्तही त्याने अनेकदा नाकारले. पण, आता रणबीर आणि माहिराचे न्यूयॉर्कमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रणबीर सध्या न्यूयॉर्कमध्ये अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचे शुटिंग करत आहे.
वाचा : Kaun Banega Crorepati पतीच्या स्वप्नासाठी जगणारी उपजिल्हाधिकारी
‘योगायोगाने’ माहिराही न्यूयॉर्कमधील एका हॉटेलात उतरली होती. तिच्या हॉटेलबाहेर हे दोघे धूम्रपान करत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘रईस’ फेम माहिराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसते. तर रणबीर त्याच्या दत्त लूकमध्ये पाहावयास मिळतोय. हे तथाकथित प्रेमीयुगुल धूम्रपान करताना काहीतरी गप्पा मारत असल्याचे फोटोवरून कळते.
गेल्या वर्षी ‘ग्लोबल टीचर प्राइज’ सोहळ्यात या दोघांनीही हजेरी लावली होती. तेव्हापासूनच यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना उधाण आले. त्यावेळी रणबीर – माहिरामध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, आम्ही केवळ एकमेकांशी बोलत होतो, असे दोघांनीही नंतर म्हटले. तसेच, त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चाही धुडकावून लावल्या.
वाचा : Golmaal Again posters रोहित शेट्टी घेऊन येतोय हॉरर आणि कॉमेडीचा तडका
एकदा प्रसार माध्यामांशी संवाद साधत असताना रणबीरने, पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही खूप सुंदर असल्याचे म्हटले होते. तर तरुण अभिनेत्यांमध्ये रणबीर कपूर हा हरहुन्नरी अभिनेता असल्याचे माहिराने म्हटले होते.