बॉलिवूडची नवी जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आता प्रसारमाध्यमांसमोर एकमेकांविषयी मोकळेपणानं बोलतात. आपल्या आवडीनिवडी, एकमेकांविषयी असलेला आदर, प्रेम याविषयी रणबीर- आलियाने आतापर्यंत बरंच काही चाहत्यांना सांगितलं आहे. अनेकांना या जोडीविषयी उत्सुकता असून त्यांच्याविषयी प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतूर असतात. अशातच रणबीरने नुकतंच सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे. फॉक्स स्टारच्या ट्विटर हँडलवरून रणबीरने चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली.
सध्या तुला कोणती गाणी ऐकायला आवडतात असा प्रश्न एका युजरने रणबीरला विचारला. त्यावेळी त्याने त्याच्या आगामी ‘संजू’ चित्रपटातील ‘कर हर मैदान फतेह’ आणि ‘राझी’ या आलियाच्या चित्रपटामधील ‘दिलबरो’ ही दोन गाणी आवडत असल्याची सांगितली. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता, तेव्हा त्या व्यक्तीशी निगडीत प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडू लागते असं म्हणतात. असंच काहीसं रणबीरच्या बाबतीत होत असल्याचं यावरून दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने तिच्या इन्स्टा स्टेटसवर ‘संजू’मधील ‘कर हर मैदान फतेह’ या गाण्याचा फोटो शेअर करत ते रिपिट मोडवर म्हणजेच वारंवार ऐकत असल्याचं म्हटलं होतं.
Kar Har Maidaan Fateh from #Sanju and Dilbaro from @RaaziHoon #JaaduKiJhappi https://t.co/UR8IIwATR9
— Star Studios (@starstudios_) June 17, 2018
वाचा : मी फेकलेला कचरा तुझ्या तोंडून निघालेल्या कचऱ्यापेक्षा कमीच होता; अनुष्का शर्मा ट्रोल
रणबीरने यापूर्वी बऱ्याचदा त्याच्या खासागी आयुष्याचा उलगडा करणं टाळलं होतं. पण, आलियासोबतच्या नात्याविषयी मात्र तसं होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता त्याला त्याची ‘मिस परफेक्ट’ भेटली आहे, असंच म्हणावं लागेल.