करोनाचा प्रादुर्भाव नसता तर आतापर्यंत गर्लफ्रेंड आलिया भट्टशी मी लग्न केलं असतं, असं वक्तव्य अभिनेता रणबीर कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलं. आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत असून नवीन वर्षात या दोघांचं लग्न होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या मुलाखतीत रणबीरने आलियाचं भरभरून कौतुकसुद्धा केलं.

राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझी गर्लफ्रेंड आलिया हिने प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत इतरांपेक्षा जास्त यश संपादन केलंय. लॉकडाउनदरम्यान तिने गिटारपासून पटकथालेखनापर्यंत जवळपास सर्वच ऑनलाइन क्लासेस जॉइन केले होते. तिच्या तुलनेत मी काहीच संपादन केलं नाही, असं मला वाटतं. लॉकडाउनमध्ये सुरुवातीला माझ्या कुटुंबावर वडिलांच्या निधनाचं संकट आलं. त्यानंतर मी स्वत:ला वाचन करण्यात, कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यात मग्न ठेवलं. दिवसाला दोन-तीन चित्रपटसुद्धा पाहायचो.”

आणखी वाचा : ज्युनिअर अंबानीचं नामकरण; वडील आकाशच्या नावाशी आहे खास कनेक्शन

लग्नाविषयी प्रश्न विचारला असता, करोना नसता तर आतापर्यंत आलियाशी लग्नगाठ बांधली असती असं रणबीर म्हणाला. पण लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देऊ असंदेखील त्याने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलियाने नुकतंच रणबीर राहत असलेल्या कॉम्प्लेक्समध्येच घर घेतलं. ज्या इमारतीत रणबीर सातव्या मजल्यावर राहतो, तिथेच आलियाने पाचव्या मजल्यावर घर घेतलं आहे. वास्तू पाली हिलमधील हे घर आलियाने जवळपास ३४ कोटी रुपयांना घेतल्याचं म्हटलं जातं. कपूर कुटुंबीयांच्या घराच्या जवळच ही इमारत आहे.