अभिनयाच्या जोरावर सिद्धार्थ जाधवने आज मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं नाणं खणखणीत वाजवलं आहे. या हरहुन्नरी अभिनेत्याने २३ ऑक्टोबर रोजी आपल्या आगामी चित्रपटाच्या सेटवर वाढदिवस साजरा केला. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो सध्या व्यग्र आहे. पण सेटवर त्याचा वाढदिवस धमाकेदार पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगने उचलली.

सेटवरच केक कापण्यात आला आणि फटाकेसुद्धा फोडण्यात आले. सेटवरील या धमाल मस्तीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सिद्धार्थ आणि रणवीर पोलिसांच्या वर्दीत आहेत. सिद्धार्थ केक कापत असताना रणवीर सिंग अफलातून डान्स करत सेलिब्रेशनचा आनंद लुटत आहे. केक कापल्यानंतर सिद्धार्थने सर्वांचे आभार मानले. गेल्या १३- १४ वर्षांपासून रोहित शेट्टीसोबत काम करत असल्याचं सिद्धार्थने यावेळी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : रणवीर- दीपिकाचं लग्न इटलीत नव्हे तर मुंबईत होणार?

रोहित शेट्टीच्याच ‘गोलमाल’ चित्रपटात सिद्धार्थने सत्तू सुपारी या कॉन्ट्रॅक्ट किलरची भूमिका साकारली होती. छोटी आणि विनोदी भूमिका असूनही सिद्धार्थ त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. ‘गोलमाल’ हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट ठरला. आगामी ‘सिम्बा’मध्ये त्याची भूमिका कशी असेल हे पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.