अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो जास्त चर्चेत असतो. रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र ढंगामध्ये हजर होतो. नुकताच रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीरचा अवतारपाहून चिमुकली रडू लागली आहे.
या व्हिडीओमध्ये रणवीर त्याच्या डबिंग स्टूडिओमधून बाहेर पडताना दिसत आहे. दरम्यान त्याने लाल रंगाचा हुडी परिधान केला आहे. अनेकांना असे वाटेल की रणवीर तर नेहमीच हूडी परिधान करतो. पण हा हूडी थोडा हटके आणि विचित्र आहे. हा हूडी रणवीरच्या पायापर्यंत आला आहे. या हूडीवर त्याने हिरव्या रंगाचे शूज, काळ्या रंगाची पँट परिधान केली असून काळ्या रंगाचा गॉगल लावला आहे. अनेक चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान एक चाहता त्याच्या छोट्या मुलीला कडेवर घेऊन रणवीर जवळ सेल्फी घेण्यासाठी येतो. रणवीरचा अवतार पाहून ती चिमुकली घालबरते आणि वडिलांना बिलगून रडू लागते.
आणखी वाचा : बिगेस्ट जोकर म्हणत नेटकऱ्यांनी उडवली रणवीर सिंगची खिल्ली
आयफा अवॉर्ड २०१९च्या रेड कार्पेटवर रणवीर आणि दीपिकाने परिधान केलेल्या कपड्यांच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आयफासाठी रणवीरने निळसर रंगाचा आऊटफिट परिधान केला असून त्यावर काळ्या रंगाची काठी हातात घेतली होती. त्याच्या या लूकची तुलना नेटकऱ्यांनी ‘भूलभुलैया’ चित्रपटातील राज पाल यादवच्या पात्रशी करत खिल्ली उडवली होती.