'बँड बाजा बारात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेता रणवीर सिंगने स्वत:ची एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. आज इंडस्ट्रीच्या लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव आवर्जून घेतले जाते. दमदार अभिनयासोबतच बॉलिवूडचा 'बाजीराव' त्याच्या अतरंगी कपड्यांसाठीही ओळखला जातो. प्रत्येक कार्यक्रमात त्याच्या हटके फॅशनचीच सर्वाधिक चर्चा होते. नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही त्याचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. बॉलिवूड थिममध्ये डिझाइन केलेल्या त्याच्या सूटने सर्वांचेच लक्ष वेधले. रणवीरने परिधान केलेल्या सूटवर १९८० आणि १९९०च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांचे पोस्टर्स होते. काळ्या रंगाच्या वेस्ट कोट आणि बो- टायवर त्याने हा रंगीत कोट आणि पँट घातला होता. सोहळ्यात त्याच्या या लूकची चर्चा होत असतानाच सोशल मीडियावरही त्यावर नेतकऱ्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही ट्विपल्सना हा अंदाज आवडला तर काहींनी त्यावरून मजेशीर मीम्स पोस्ट केले. Yeh ek hi piece banaya hai bhagwan ne — SwatKat- The dancing Rajput (@swatic12) January 20, 2018 वाचा : प्रभासची लगीनघाई; काकांनी दिले संकेत चित्रपट असो, फॅशन असो किंवा एखादा कार्यक्रम, नेहमी चर्चांमध्ये कसे राहायचे हे रणवीर अचूक जाणतो. त्याचा आगामी 'पद्मावत' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. यामध्ये तो अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे. त्याच्या दमदार अभिनयाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली असतानाच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.