अभिनयासोबत आपल्या लूकसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता रणवीर सिंग त्याच्या प्रत्येक चित्रपटात एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळतो. ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’नंतर आता ‘पद्मावती’ चित्रपटात रणवीर हटके लूकमध्ये दिसणार आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी त्याने मिशा वाढवल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्या या लूकने सर्वांनाच वेड लावलं. अनेकांनी रणवीरचा हा लूक कॉपी केला. त्याला नुकतंच मुंबईतील एका रेस्तराँबाहेर पाहिलं गेलं. यावेळी बॉलिवूडच्या या ‘बाजीराव’ने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. रणवीरने त्यालाही प्रिय असलेली दाढी आणि मिशा कापल्या आहेत.

यावेळी ट्रिम न करता रणवीरने त्याच्या मिशा आणि दाढी पूर्णपणे कापल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने केसही वाढवले आहेत. त्याचा हा नवीन लूक ‘पद्मावती’साठी आहे की जोया अख्तरच्या ‘गली बॉय’साठी आहे हे मात्र अद्याप कळले नाही. बॉलिवूडमध्ये ७ वर्षांच्या करिअरमध्ये रणवीर फक्त ‘बँड बाजा बारात’, ‘दिल धडकने दो’ आणि ‘बेफिक्रे’ या तीन चित्रपटांमध्येच क्लिन शेव्ह केलेल्या लूकमध्ये दिसला.

ipl 2024 shubman gill fan girl shaini jetani trolled fans saying she making gujarat titans captain lose his focus
“शुबमन गिल तुझ्यामुळे आउट होतोय”; चाहतीच्या ‘त्या’ VIDEO तील कृत्यांवर भडकले नेटिझन्स; म्हणाले, “स्वप्न…”
Bansuri Swaraj underlines this message My mother’s daughter
सुषमा स्वराज यांचेच माझ्यावर संस्कार, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार; बन्सुरी स्वराज यांची भावनिक साद
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

वाचा : अनिल कपूरच्या मुलींचं नाव पाठीवर गोंदवणारा ‘हा’ तरुण कोण?

विशेष म्हणजे यावेळी त्याने सोशल मीडियावर याबाबत कोणतीही पोस्ट केली नाही. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा त्याने दाढी ट्रिम केली होती तेव्हा त्याने इन्स्टाग्राम लाइव्हसुद्धा केला होता. ट्रिम करण्यापूर्वीचा आणि केल्यानंतरचा फोटोही त्याने शेअर केला होता. आपल्या लूकबाबत नेहमीच प्रयोगशील असलेला रणवीर ‘पद्मावती’ चित्रपटात अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारतोय. यानंतर तो आलिया भट्टसोबत झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.