सेलिब्रिटींवर नेहमीच वेगवेगळ्या भेटवस्तूंचा वर्षाव होतच असतो. आपल्या आवडत्या कलाकारांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक चाहते आपल्या आवडत्या अभिनेता अभिनेत्रींना आपापल्या परिनं विशेष भेट देतच असतात. नुकतीच रणवीर सिंगला एका चाहत्यानं खास भेट दिली. विशेष म्हणजे ही भेट रणवीरनं स्विकारून तिला आपल्या घरात खास जागा दिली आहे.
भांड्यांच्या दुकानात काम करणारा ‘तो’ झाला चित्रपट निर्माता
रणवीरनं ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये साकारलेल्या बाजीराव पेशव्यांची भूमिका अनेकांना भावली. रणवीरच्या अभिनयानं प्रभवित झालेल्या त्याच्या एका चाहत्यानं रणवीरचं सुंदर चित्र रेखाटलं होतं. हे चित्र यशराज फिल्मच्या ऑफिसमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर रणवीरकडे ते सुपूर्त करण्यात आलं. रणवीरची बाजीरांवाच्या भूमिकेतील ती प्रतिमा होती. या प्रतिमेला रणवीरनं विशेष स्थान दिलं आहे. त्यानं हे चित्र आपल्या घरात लावलं आहे. यामागे खास कारणही आहे.
रणवीरला मागे टाकत आयपीएलमध्ये वरूणने मारली बाजी
बाजीरावांची प्रतिमा आपल्याला नेहमीच चांगलं काम करण्याची, लढण्याची प्रेरणा देईल असा विश्वास त्याला आहे म्हणूनच आपल्या घरात त्यानं हे चित्र लावलं आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ सिनेमात रणवीरनं अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारली होती. रणवीरच्या अभिनयाचं अर्थात सगळ्यांनी कौतुक केलं. पण या भूमिकेमुळे रणवीर मात्र कमालीच अस्वस्थ झाला होता. चित्रिकरण संपल्यानंतर काही काळ रणवीर नैराश्येतही गेला होता. रणवीरनं स्वत: याची कबुली दिली होती. त्यामुळे बाजीरांवाचं चित्र आपल्याला नेहमीच प्रेरणा देईल अशी रणवीरची भावना आहे.