बॉलिवूडचा बाजीराव म्हणून अभिनेता रणवीर सिंग ओळखला जातो. आजा ६ जुलै रणवीरचा वाढदिवस आहे. रणवीर आज ३६ वर्षांचा झाला आहे. रणवीर त्याच्या हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे सतत चर्चेत असतो. रणवीर एक उत्तम अभिनेता देखील आहे. रणवीरने अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज रणवीरच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्याचा करिअरच्या सुरुवातीचा त्याचा ऑडिशनचा एक व्हिडीओ पाहूया..

रणवीर आज आघाडीचा अभिनेता असला तरी त्याला करिअरच्या सुरुवातीला बरीच मेहनत घ्यावी लागली होती. रणवीर अनेक ठिकाणी ऑडिशनला जायचा. त्यापैकी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणवीर ऑडिशन देत असल्याचे दिसतं आहे. या व्हिडीओत रणवीर त्याच्या स्टाइलमध्ये काही डान्स स्टेप करताना दिसत आहे. त्याचा हा डान्स पाहून त्याच्या आजू बाजूच्या लोकांना हसू अनावर झाल्याचे दिसतं आहे. तरी देखील रणवीर त्यांच्याकडे लक्ष न देता. त्याच्या ऑडिशनकडे लक्ष देताना दिसतं आहे. त्याच्या या मेहनतीमुळे आज तो लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल

आणखी वाचा : Video: पोटाची चरबी कमी करायची? मलायकाने दिल्या टिप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता होण्याआधी रणवीरने अनेक कंपन्यांसाठी कॉपी रायटरचे काम केले आहे. २०१० मध्ये प्रदर्शित झालेला बॅंड बाजा बारात या चित्रपटातून रणवीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात रणवीरसोबत मुख्य भूमिकेत अनुष्का शर्मा होती. या चित्रपटानंतर रणवीरने कधी पाठी वळून पाहिले नाही.