‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘आयर्नमॅन’, ‘कॅप्टन अमेरिका’ यांसारख्या शेकडो सुपरहिरोंची निर्मिती करणाऱ्या मार्व्हल आणि डीसी या दोन कंपन्यांना आज सुपरहिरो तयार करण्याचे कारखाने असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या कॉमिक्स सुपरहिरोंना रुपेरी पडद्यावर उतरवून आजवर अब्जावधी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आणि आता त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत चित्रपट निर्माता करण जोहर देखील एक सुपरहिरो चित्रपट मालिका तयार करण्याची तयारी करत आहे. या चित्रपटांसाठी त्याने सुपरहिरो म्हणून अष्टपैलु बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याची निवड केली आहे.

रेखा यांच्याशी स्वतःची तुलना करणाऱ्या साराची वरूण धवननं घेतली फिरकी

रणवीर येत्या काळात प्रेक्षकांना सुपरहिरो ‘नागराज’च्या अवतारात दिसेल. राज कॉमिक्सचे सहसंस्थापक संजय गुप्ता यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून करण जोहरच्या या आगामी प्रकल्पाची माहिती दिली. “करण जोहर, रणवीर सिंग आणि नागराज यांच्या भेटीगाठी गेल्या काही काळात वाढल्या आहेत.” अशा आशयाची पोस्ट संजय गुप्ता यांनी केली आहे. या पोस्टमुळे राज कॉमिक्स आणि धर्मा प्रोडक्शन एकत्र येऊन एका सुपरहिरो चित्रपट मालिकेची निर्मिती करणार आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘या’ फोटोमुळे सोहाला मागावी लागली सैफची माफी

‘कांदा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा’, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

कोण आहे नागराज?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागराज हा एक कॉमिक्स सुपरहिरो आहे. राजकुमार गुप्ता, मनोज गुप्ता व संजय गुप्ता या तिघांनी मिळून १९८६ साली राज कॉमिक्ससाठी ‘नागराज’ या सुपरहिरो व्यक्तिरेखेची निर्मिती केली होती. लहान मुलांच्या सर्वाधिक आवडत्या भारतीय सुपरहिरोंपैकी एक म्हणून नागराज ओळखला जातो.