बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’ कतरिना कैफने जवळपास सर्वच अभिनेत्यांसोबत काम केलं. मात्र बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंगसोबत अद्याप कोणताही सिनेमा केला नाही. ‘बँड बाजा बारात’ सिनेमातून पदार्पण केलेल्या रणवीरने काही काळातच सिनेविश्वात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या दोघांनी जरी त्यांच्या नात्याबद्दल कधी खुलेपणाने वाच्यता केली नसली तरी आता हे एक उघड सत्य आहे. त्यामुळेच दीपिका आणि कतरिनामधील शीतयुद्ध मिटवण्यासाठी रणवीर जरी प्रयत्न करीत असला तरी कतरिनासोबत काम करण्यास त्याने नकार दिलाय.
‘बार बार देखो’ सिनेमाची दिग्दर्शिका नित्या मेहराने रणवीरला कतरिनासोबत काम करण्याबाबत विचारले. मात्र रणवीरने साफ नकार दिला. नित्या मेहराची खास मैत्रिण जोया अख्तरने रणवीरसाठी ही ऑफर दिली होती. झोया अख्तरच्या एका पार्टीमध्ये रणवीर सिंग आणि कतरिनाची भेट झाली होती आणि तेव्हा या सिनेमाबद्दल दोघांमध्ये चर्चासुद्धा झाली होती. रणवीरने कतरिनासोबत काम करण्यास नकार दिल्याने दीपिका पदुकोण मात्र खूप खूष आहे. याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आली नसून रणवीरच्या प्रवक्त्याने ही ऑफर नाकारले नसल्याचे सांगितले आहे.
वाचा : शाहरूखचा ‘देवदास’ येतोय थ्रीडीमध्ये
सध्या रणवीर आणि कतरिना दोघेही आपल्या कामात व्यस्त आहेत. कतरिना आगामी चित्रपट ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे तर रणवीर ‘पद्मावती’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये. भविष्यात जर या दोघेही एकत्र काम करण्यास तयार झाले तर त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री बघायला चाहत्यांना नक्कीच आवडेल.