दीपिका आणि रणवीरमधले प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. हे तथाकथित प्रेमीयुगुल अनेक कार्यक्रमांमध्ये आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकत्रच दिसते. आता काही दिवसांवरच व्हॅलेंटाइन डे आला आहे. मग हे प्रेमीयुगुल तरी कसे मागे राहिल.
सध्या दीपिका ही ‘xXx’ या हॉलीवूड चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी टोरंटोला गेली आहे. मग काय तिच्या मागोमाग आता रणवीरही तिथे पोहचलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या कामास सुरुवात करण्यापूर्वी रणवीरकडे काही रिकामी वेळ आहे. त्यामुळे त्याला हा वेळ एकट्याने घालवण्याची इच्छा नाही म्हणून तो दीपिकाला सरप्राइज देण्यासाठी गुरुवारी सकाळी कॅनडाला रवाना झाला. टोरंटोला पोहचल्यावर रणवीरने एका चाहतीसोबत काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्यात आलेला आहे.
रणवीरला टोरंटोमध्ये पाहून दीपिकाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल.

Story img Loader