आधीच ‘पद्मावती’ चित्रपटामागचे वाद संपत नाही आहेत. त्यात आता चित्रपटात अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा रणवीर सिंग त्याच्या ट्विटमुळे ट्रोल झाला आहे. रणवीरने काल त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून स्वतःच्या फोटोसह ‘लूजिंग माय रिलिजन’ असे ट्विट केले होते. त्याच्या या ट्विटचा नक्की काय अर्थ लावायचा या नादात नेटिझन्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Padmavati Song : पद्मावती- महारावल रतन सिंहमधील प्रेम दर्शवणारे ‘एक दिल एक जान’ गाणे

रणवीर हे सर्वकाही वाद ओढावून घेण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी करतोय असे काही नेटिझन्सनी म्हटले. तसेच, स्वतःच्या धर्मावरून असे ट्विट करण्यासाठी काहीजणांनी त्याला फटकारलेदेखील. तर, रणवीरच्या काही चाहत्यांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहत चित्रपटाभोवती असलेल्या वादांना कंटाळूनच त्याने असे ट्विट केल्याचे लिहिलं.

Video : छोट्या रणबीर-करिनाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘सो क्यूट’

या ट्विटबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण, रणवीरने केलेले ट्विट हे आंतरराष्ट्रीय म्युझिक बॅण्ड ‘आरईएम’च्या प्रसिद्ध गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे चिंतीत होणे असा या गाण्याचा अर्थ आहे. मात्र, रणवीरने त्याच्या ट्विटमध्ये ते गाणे आहे असा उल्लेख केलेला नाही. त्यामुळेच त्याला ट्रोल केले जात आहे.