बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या सुलतान चित्रपटाची सध्या तिकीटबारीवर विक्रमी घोडदौड सुरू आहे. बॉलीवूडकर देखील सुलतान चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. नुकतेच अभिनेता रणवीर सिंगने पॅरिसमध्ये सुलतान चित्रपट पाहिला. यावेळी सुलतानच्या बेबी को बेस पसंद है आणि लगे ४४० वोल्ट गाण्यांवर थिरकण्याचा मोह रणवीरला आवरता आला नाही. त्याने चित्रपटाच्या स्क्रिनिंग सुरू असतानाच गाण्यांवर बेधुंद होऊन नाचण्यास सुरूवात केली. उपस्थितांनाही रणवीरच्या नृत्याला जोरदार प्रतिसाद दिला.
रणवीर सध्या पॅरिसमध्ये ‘बेफीक्रे’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याने आपल्या दैनंदिन वेळापत्रकातून वेळ काढून पॅरिसमधील एका चित्रपटगृहात सुलतान चित्रपट पाहिला. सुलतानच्या गाण्यावर थिरकतानाचे रणवीरचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले असून, ट्विटरवर #RanveerwatchesSultan हा हॅशटॅग देखील ट्रेंडमध्ये होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले रणवीरचे व्हिडिओ-

Story img Loader