सध्या बॉलिवूडमध्ये सर्वांत जास्त चर्चेत असणारा स्टारकिड म्हटल्यास तैमुर अली खानचं नाव घेतलं जाईल. एखाद्या सुपस्टारप्रमाणेच तैमुरच्या स्टारडम आहे. करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमुर येत्या २० डिसेंबरला एक वर्षाचा होणार आहे. सैफच्या या छोट्या नवाबचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला जाईल, याविषयी अनेकांनाच उत्सुकता आहे. त्याची मावशी करिश्मा कपूरने चाहत्यांची ही उत्सुकता अधिक न ताणता त्याच्या बर्थडे प्लॅनिंगची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

करिश्माने सांगितले की, ‘हो, तैमुरचा वाढदिवस जवळ येतोय आणि आमच्यासाठी हा दिवस खूप विशेष आहे. कुटुंबातील सर्वजण त्याच्या वाढदिवसासाठी उत्सुक आहेत. त्या दिवशी सर्वजण एकत्र जमणार आहोत, पण ते फारसं मोठं सेलिब्रेशन नसेल.’ तैमुरचा पहिला वाढदिवस जल्लोषात साजरा केला जाणार नसला तरी कपूर कुटुंब यादिवशी एकत्र जमणार असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहिद कपूरनेही मिशाचा पहिला वाढदिवस साजरा केला. मात्र, हे सेलिब्रेशनसुद्धा फारसं मोठं नव्हतं.

वाचा : अक्षयच्या ‘त्या’ आक्षेपार्ह टिप्पणीचा अर्थ ट्विंकलने सांगितला

तैमुर कुठेही दिसला तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात. त्याच्या प्रत्येक लूकची चर्चा होते. त्याच्या आवडीनिवडीबद्दलही अनेक गोष्टी सोशल मीडियावर लिहिल्या जातात. त्यामुळे त्याच्या पहिल्या वाढदिवसाबद्दलही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होईल असं म्हणायला हरकत नाही.

Story img Loader