करिना कपूर आणि सैफ अली खानचा चिमुकला तैमुर हा त्याच्या जन्मापासूनच इंटरनेटवर चर्चेत असल्याचं पाहायला मिळालं. त्याचे स्टारडम हे कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. तो कुठेही दिसला तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात. सैफ आणि करिना जरी त्याच्यासोबत असले तरी चर्चा फक्त तैमुरचीच होते. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या जातात तर क्षणार्धात त्याचे सुंदर फोटो व्हायरल होतात. तैमुरचे हे फोटो कोण काढत असेल याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तैमुरचा काका अभिनेता कुणाल खेमूने हा खुलासा केला आहे. कुणाल म्हणाला की, ‘तुम्हाला गंमत वाटेल, पण तैमुरचे व्हायरल होत असलेले सर्व फोटो मीच काढले आहेत.’ तैमुरचे फोटो त्याच्या चाहत्यांपर्यंत कुणालमुळेच पोहोचले, असं म्हणायला हरकत नाही.

https://www.instagram.com/p/BZ_wwHin2ID/

PHOTO : इनायासोबत कुणालचे सुरेख क्षण

तैमुरचे प्रसारमाध्यमांमध्ये असणारी क्रेझ पाहता करिना आणि सैफने त्याला यापासून दूर नेण्याचा निर्णय घेतल्याचं सैफने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तैमुरभोवती असणाऱ्या माध्यमांच्या गराड्यामुळे त्याचं बालपण हरवू नये म्हणून त्याला इंग्लंडमधील एका चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये घालणार आहेत.

https://www.instagram.com/p/BZ1NHdvnt6P/

https://www.instagram.com/p/BZnta4bnDrB/

PHOTOS : असा साजरा केला सनी-डॅनियलने निशाचा वाढदिवस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कुणालच्याही आयुष्यात नुकतंच तान्हुलीचं आगमन झालंय. इनायाविषयीही त्याने या मुलाखतीत बरंच काही सांगितलं. तो म्हणाला की, ‘इनाया हे नाव मी सुचवलं होतं. सोहा आणि मी मुलींच्या नावांची एक यादीच घेऊन बसलो होतो. इनाया हे नाव आम्हा दोघांनाही आवडलं आणि नवमीला तिचा जन्म झाल्याने इनाया नौमी असं नाव ठेवलं.’

https://www.instagram.com/p/BZSUrOcHdry/