आमिर खानच्या काही गाजलेल्या चित्रपटांच्या यादीतील ‘३ इडियट्स’ हा अनेकांच्याच आवडीचा आहे. या चित्रपटात आमिरने साकारलेली भूमिका सोनम वांगचुक नावाच्या एका व्यक्तीच्या आयुष्यापासून प्रेरित होती. मुळचे लेहचे असणारे सोनम वांगचुक या चित्रपटानंतर प्रकाशझोतात आले. सध्याच्या घडीलासुद्धा त्यांच्याविषयीच्या चर्चा रंगत असून, त्यामागचे कारण आहे, वांगचुक यांचे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प.

भारतात लडाखमधील दुर्गम पर्वतरांगांच्या भागामध्ये विद्यापीठ सुरु करण्यासाठी त्यांना १४ कोटी रुपयांची गरज आहे. विशेष कौशल्यावर आणि अभ्यासक्रमावर भर देणाऱ्या या विद्यापीठातून एक वेगळी क्रांती घडवण्याची त्यांची इच्छा आहे. या प्रकल्पासाठी त्यांना तब्बल ८०० कोटी रुपयांची गरज आहे. ज्यात अभ्यासक्रम महामंडळांसाठी त्यांना १४ कोटींची गरज लागणार आहे. ही मोठी रक्कम गोळा करण्यासाठी त्यांनी सात कोटी रुपये सर्वसामान्यांच्या योगदानातून आणि सात कोटी रुपये कॉर्पोरेट सीएसआरच्या योगदानातून मिळवण्याचा मानस असल्याचे वांगचुक यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी काही संस्थाशी हातमिळवणीही केली आहे.

Rambhau Ingole, Vimalashram,
विमलाश्रमच्या रामभाऊ इंगोले यांना आर्थिक मदतीची गरज, दानशूर व्यक्तींना आवाहन
chinu kala Rubans Accessories
हातात कपड्यांची पिशवी अन् खिशात ३०० रुपये; १५व्या वर्षी घर सोडून कष्टाने उभारली ४० कोटींची कंपनी!
Nagpur Central Jail, Inmates Meet Their Children, Inmates Meet Their Parents, Heartwarming Gathering Program, Nagpur Central Jail Inmates Meet Children, police, inmates, Nagpur news, marathi news,
रुसवे, फुगवे अन गोडवे! कारागृहातील कैद्यांनी घेतली मुलांची गळाभेट
onion, onion export ban, farmers,
कांदा निर्यातबंदी उठवूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच, झाले काय?
google lay off
Googleने कोअर टीममधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण भारतीयांसाठी सुवर्णसंधी!
Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

आतापर्यंत वांगचुक यांच्याकडे देणगी स्वरुपात ४.६ कोटींची रक्कम जमा झाल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने प्रसिद्ध केले आहे. लडाखमधील शैक्षणिक यंत्रणेत काही महत्त्वाचे आणि प्रगतीशील बदल घडवण्यासाठी वांगचुक यांनी ‘सेकमोल’ची स्थापना केली होती. त्यामागोमागच आता आपल्या कामाच्या कक्षा रुंदावत त्या भागातील विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी वांगचुक यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे. लडाखमधील फयांग घाटी परिसरातील २०० एकरांच्या भूखंडावर हे विद्यापीठ स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे. ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्स लडाख’ नावाने हे विद्यापीठ नावारुपास येईल. वांगचुक यांच्या या प्रकल्पासाठी त्यांना लडाख हिल काऊन्सिलकडून भूखंड देण्यात आला आहे. त्यामुळे आता खऱ्याखुऱ्या आणि प्रचंड महत्त्वाकांक्षी अशा फुंसुक वांगडूला मदत करण्यासाठी कोण कोण पुढाकार घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.