आगामी ‘टायगर जिंदा है’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘सुई धागा- मेड इन इंडिया’, ‘संदीप और पिंकी फरार’, ‘हिचकी’ या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. आमिर खान, सलमान खान, कतरिना कैफ, राणी मुखर्जी, वरुण धवन, अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा ही बडी स्टारमंडळी विविध चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सलमान खान – कतरिना कैफच्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या सेटवरील अनेक स्निक पिक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होईल. तसेच, यशराज फिल्म्सनेसुद्धा येत्या वर्षभरातील त्यांच्या चित्रपटांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०१७ चे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी फार यशस्वी राहिले नाही. पण २०१८मध्ये काही दमदार विषय आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतील असे दिसते.
वाचा : ‘तैमुरला चित्रपटात घेणं तिला परवडणार नाही’
राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या स्त्रीप्रधान चित्रपटाने वर्षाची सुरुवात होईल. २३ फेब्रुवारी २०१८ला हा चित्रपट प्रदर्शित होईल. ‘मर्दानी’ फेम या अभिनेत्रीला तिचे चाहते जवळपास तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पाहू शकणार आहेत. आपल्या सर्वात मोठ्या कमकुवत बाजूलाच आपली ताकद बनवणाऱ्या महिलेवर चित्रपटाची कथा आधारित आहे.
#YRFMoviesCalendar | #Hichki | @HichkiTheFilm pic.twitter.com/DFWfVKmQrz
— Yash Raj Films (@yrf) September 15, 2017
यानंतर अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट ३ ऑगस्ट २०१८ला प्रदर्शित होईल. भारतातील दोन विविध भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलगा आणि मुलीवर चित्रपट असून, त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल असलेला द्वेष आणि अविश्वास यात पाहावयास मिळेल.
वाचा : जाणून घ्या, ‘तुझं माझं ब्रेक अप’ या नवीन मालिकेची कथा
#YRFMoviesCalendar | #SandeepAurPinkyFaraar | @SAPFTheFilm pic.twitter.com/wS3H4AVrvt
— Yash Raj Films (@yrf) September 15, 2017
वरुण धवन, अनुष्का शर्मा यांच्या ‘सुई धागा – मेड इन इंडिया’ या चित्रपटामुळे ‘दम लगा के हैशा’ चित्रपटातील जोडी मनीष शर्मा आणि शरत कटारिया पुन्हा एकत्र येत आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर २०१८ला प्रदर्शित होईल. शरतने चित्रपटाची कथा लिहिली आहे.
#YRFMoviesCalendar | #SuiDhaaga | @SuiDhaagaFilm pic.twitter.com/Em031g8e9m
— Yash Raj Films (@yrf) September 15, 2017
सगळ्यात शेवटी अमिताभ बच्चन, आमिर खान यांचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट ७ नोव्हेंबर २०१८ ला प्रदर्शित होईल. यशराज फिल्म्सने या चित्रपटाचा उल्लेख ‘अॅक्शन अॅडव्हेंचर’ असा केला असून, चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याचे म्हटलेय.
#YRFMoviesCalendar | #ThugsOfHindostan | @TOHTheFilm pic.twitter.com/0J4HA0tAKc
— Yash Raj Films (@yrf) September 15, 2017