जवळपास १५ वर्षांपूर्वी २००२ साली एका म्युझिक व्हिडिओमुळे एक सुंदर मुलगी बरीच प्रसिद्ध झाली. या मुलीच नाव आहे शेफाली जरीवाला. जुन्या गाण्याचे रिमिक्स करून तयार करण्यात आलेले ‘कांटा लगा..’ हे गाणे त्यावेळी सर्वांच्याच आवडीचे झाले होते. डिस्कोपासून पार्ट्यांपर्यंत तसेच अगदी हळदी समारंभातही हे गाणं वाजवलं जायचं. या गाण्यामुळे शेफाली रातोरात प्रसिद्ध झाली आणि तिला लोक ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखू लागले.

वाचा : अक्षयला बॉलिवूडमध्ये एण्ट्री देणारी ‘ती’ आता लाइमलाइटपासून दूर

शेफालीने गाण्याचा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या तालावर नाचायला, गायला भाग पाडले होते. तिच्या सौंदर्यावर तर अनेकजण घायाळ झाले होती. यानंतर ती सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटात आयटम साँग करताना दिसली. ‘बुगी वुगी’, ‘नच बलिये ५’ आणि ‘नच बलिये ७’ या रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली.

वाचा : प्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

‘मीत ब्रदर्स’ या प्रसिद्ध गायक जोडीतील हरमीत गुलजार याच्याशी तिने लग्न केले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. हरमीत तिला मारहाण करायचा अशी तक्रार तिने पोलिसांकडे त्यावेळी केलेली. त्यानंतर अभिनेता पराग त्यागीला ती डेट करत होती. पराग आणि शेफाली ‘नच बलिये’च्या एका पर्वातही झळकले होते. जवळपास चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केल्याचेही वृत्त गेल्यावर्षी आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शेफालीचे हे फोटो पाहून आजही तिच्या सौंदर्यात तसूभर फरक न पडल्याचे दिसते. उलट तिचे सौंदर्य आता अधिक खुलून आले असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.