‘मस्तीजादे’ या आगामी चित्रपटातील अभिनेत्री सनी लिओनीचा आणखी एक बोल्ड लूक मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. बिकिनी घातलेली सनी लिओनी यामध्ये भलतीच आकर्षक दिसत आहे. माजी पॉर्नपरी ते बॉलीवूड अभिनेत्री असा प्रवास केलेली सनी या छायाचित्रात हातात साबणाचा स्पंज घेऊन एका स्पोर्टस कारवर बसलेली दिसत आहे. ‘मस्तीजादे’ हा हा प्रौढ-विनोदीपट असून बऱ्याच काळापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात सनी लिओनी बरोबर तुषार कपुर आणि वीर दास प्रमुख भुमिका साकारताना दिसतील. मिलाप झवेरी दिग्दर्शीत या चित्रपटाचे मोशन पोस्टर काही महिन्यांपुर्वीच प्रदर्शित करण्यात आले होते. या संपूर्ण चित्रपटाकरता सनीला दोन ड्रेस, काही शॉर्ट्सच्या जोडय़ा आणि २७ बिकिनी एवढाच कपडेपट देण्यात आला होता. चित्रपटाच्या नावावरूनच त्याचा आशय स्पष्ट होत असला तरी संपूर्ण चित्रपटात तिला २७ बिकिनी घालून वावरायचे होते. यासाठी तिला आणखी वजन घटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याची माहिती तिचा स्टायलिस्ट हितेंद्र कापोपारा याने दिली होती. येत्या २९ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
.@SunnyLeone, in a bikini, ready to hose down a sports car! What more could Bangkok ask for? https://t.co/GY1tjVOAqz pic.twitter.com/70HUQaebp2
— Mastizaade (@MastizaadeFilm) December 15, 2015
सनी लिऑनसाठी फक्त २७ बिकिनी
सनी लिओनी-डॅनियल वेबरच्या घरी हलणार पाळणा!