दिवंगत अभिनेता सुशांत यांच्या कुटुंबीयांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी ईडी रिया व तिच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहे. या चौकशीदरम्यान रियानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांत सिंह यांची बहीण नशेत चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होती, असा धक्कादायक खुलासा रियानं केला आहे. रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या मृत्यूपूर्वी झालेल्या अनेक घटनाचे धक्कादायक खुलासे केले आहेत.

रियाने आपल्या जबाबात म्हटलेय की, सुशांतसोबतच्या नात्याची सुरुवात झाल्यानंतर त्याच्या घरी राहायला गेले होते. त्यावेळी सुशांतची बहीण प्रियंका आणि तिचा पती सिद्धार्थ हे सुशांतसोबतच राहत होते. एप्रिल २०१९ च्या एका रात्री रिया आणि प्रियंका एका पार्टीत गेल्या होत्या. त्यावेळी प्रियंकानं प्रमाणापेक्षा जास्त मद्याचं सेवन केलं होतं. नशेत प्रियंका पुरुष आणि महिलांसोबत विचित्र चाळे करत होती. दुसऱ्या दिवशी शूटिंगला जायचं असल्यामुळे मी त्या पार्टीतून लगेच पलायन केलं. पण अद्याप पार्टीमध्ये प्रियंकाने अतिप्रमाणात दारु प्राशन करत होती. मी घरी आल्यानंतर सुशांत्या बेडवर झोपले होते. रात्री मला अचानक जाग आली तेव्हा बेडवर प्रियंका झोपली होती आणि ती मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होती.

आणखी वाचा : सुशांतने फ्लॅट घेऊन दिला? आरोप करणाऱ्यांना अंकितानं दाखवला आरसा

हे सर्व पाहून रिया चकित झाली अन् घरातूनच निघून गेली. त्यानंतर रियानं सुशांतला घरातून बाहेर निघाल्याचं कारण सांगितलं. त्यानंतर सुशांत आणि बहीणीचं यावरुन भांडण झालं होतं. या प्रकरणानंतर रिया आणि सुशांतच्या कुटुंबीयातील नात दुरावलं गेलं. सुशांतच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणाऱ्या २० जणांची नावं काढली त्यावेळी त्यात माझं नाव नव्हते त्यामुळे अंत्यसंस्काराला जाऊ शकले नाही.

सुशांत घरी फोन करुन मुंबईला आल्याचं कारण सांगत होता आणि सर्वांना इथं येण्याची विनवणी करत होता. अनेक दिवस सुशांत त्यांना विनवणी करत फोनवरच रडत होता. शेवटी ८ जून २०२० रोजी बहीण मीतू मुंबईत येण्यासाठी तयार झाली होती. मीतू राहायला आल्यानंतर सुशांतने रियाला घरी राहायला जायला सांगितलं होतं.