मंगळवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) तिला अटक केली आहे. आता एनसीबी रियाची चौकशी करत असून रियाने २५ बड्या कलाकारांची नावे घेतली आहेत. त्यामध्ये सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचा समावेश असल्याचे ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. आता आणखी दोन बड्या कलाकारांची नावे पुढे आली आहेत.
‘झी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार ड्रग्स सेवन प्रकरणात पाच सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या पाठोपाठ सुशांतची मैत्रीण आणि रेनड्रॉप मीडियाची फाऊंडर रोहिणी अय्यरचा समावेश आहे. तसेच ‘दिल बेचारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांचा देखील समावेश आहे.
रियाला अटक करण्यापूर्वी एनसीबीने तिची चौकशी केली होती. या चौकशीमध्ये तिने बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या ड्रग्स पार्ट्यांविषयी काही खुलासे केले होते. तसेच २५ बड्या कलाकारांची नावेदेखील घेतली होती.