गेल्या काही दिवसांपासून ‘सैराट’ चित्रपटातून महाराष्ट्रातील लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु चर्चेत आहे. या चर्चा तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’मुळे रंगल्या आहेत. आता रिंकूचा साखरपूडा झाल्याचे म्हटले जात आहे. पण तिचा खराखुरा साखरपूडा झाला नसून ‘मेकअप’ चित्रपटातील नवे गाणे लॉन्च करण्यात आले आहे. या चित्रपटात रिंकूसोबत चिन्मय उदगीरकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रिंकू पूर्वीच्या आणि चिन्मय नीलच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या नव्या गाण्यात त्या दोघांचा साखरपूडा झाल्याचे दिसत आहे.

पूर्वी आणि नीलचा साखरपुडा नुकताच दणक्यात पार पडला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांसह मीडियाही उपस्थित होती. थोडे अचंबित झालात ना? कारणच तसे आहे. खरं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्नाच्या आधी येणारा हा खास क्षण. हा क्षण अधिकच अविस्मरणीय करण्यासाठी गणेश पंडित लिखित, दिग्दर्शित ‘मेकअप’ चित्रपटातील ‘गाठी गं’ हे गाणेही नुकतेच पूर्वी आणि नीलच्या साखरपुड्याच्या निमित्ताने धुमधडाक्यात लाँच करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साखरपुड्यावर आधारित असलेले हे गाणे उत्साहाने भरलेले आहे. यात नीलला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तर अनेक स्वप्ने उराशी बाळगून नव्या आयुष्याची सुरुवात होत असतानाच काळजात सुरु असलेली धाकधूक पूर्वीच्या चेहऱ्यावर दिसत आहे. नील -पूर्वीच्या साखरपुड्याचा आनंद सगळ्यांच्याच चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचे दिसत आहे. नकळत आपल्या स्वतःच्या आयुष्याशी जोडता येणारे हे गाणे शाल्मली खोलगडेने गायले असून या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. तसेच या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत. या गाण्याला विठ्ठल पाटील यांचे नृत्य दिग्दर्शन लाभले आहे.