नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला रिंकू राजगुरु ही नवअभिनेत्री मिळाली. अभिनयाशी काहीही संबंध नसताना रिंकूने तिच्या सैराट अभिनयाने सर्वांना झिंगाट करून सोडले. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत रिंकूने पदार्पणातचं राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला. अवघ्या १५ वर्षांच्या रिंकूने सर्वांवर अशी काही जादू चालवली की या चित्रपटाने बॉक्स ऑफीस कमाईचा रेकॉर्डच केला. आतापर्यंत या चित्रपटाने ७० कोटींपेक्षा अधिक गल्ला कमविला आहे. लोकांच्या मनावर राज्य करणा-या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे.
रिंकूचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरु असून तिचा जन्म ३ जून २००१ रोजी अकलूज येथे झाला. रिंकूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकसत्ता ऑनलाईनने तिचे वडिल महादेव राजगुरु यांच्याशी संवाद साधला. तिने चित्रपटसृष्टीतील पदार्पणातचं मोठे यश संपादित केले आहे. त्यामुळे नक्कीच राजगुरु कुटुंबातही दुप्पट आनंद साजरा केला जाईल. त्यावर रिंकूचे वडिल म्हणाले की, रिंकू आज पुण्यातचं आहे. आम्ही अगदी साध्या पद्धतीने घरीच तिचा वाढदिवस साजरा करणार आहोत.
सोशल मीडियातूनही तिच्यावर अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. तुम्हीही तुमच्या लाडक्या अभिनेत्रीला खाली दिलेल्या प्रतिक्रिया बॉक्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Story img Loader